मराठी बातम्या /बातम्या /देश /

अमृतसरमध्ये शेतात कोसळलेला ड्रोन पाकिस्तानी? भारतीय हवाई दलानं दिली माहिती

अमृतसरमध्ये शेतात कोसळलेला ड्रोन पाकिस्तानी? भारतीय हवाई दलानं दिली माहिती

अमृतसर येथील एका भात शेतीत कोसळलेला ड्रोन...

अमृतसर येथील एका भात शेतीत कोसळलेला ड्रोन...

अमृतसरमधील एका शेतात टिफिन बॉम्ब आणि अन्य काही स्फोटकं (Found Tiffin bombs and some other explosives) आढळल्यानंतर, आता येथील एका शेतात ड्रोन कोसळल्याची (drone crashes in Amritsar) घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

चंदीगड, 11 ऑगस्ट: अमृतसरमधील (Amritsar) एका शेतात टिफिन बॉम्ब आणि अन्य काही स्फोटकं (Found Tiffin bombs and some other explosives) आढळल्यानंतर अमृतसर येथील एका शेतात ड्रोन कोसळल्याची (drone crashes in Amritsar) घटना समोर आली आहे. मंगळवारी सायंकाळी एक मानवरहित ड्रोन शेतात कोसळल्यानंतर, आजूबाजूच्या जवळपास डझनभर गावात दहशतीच वातावरण पसरलं होतं. अमृतसरनजीक असणाऱ्या मालो गिल गावात हे ड्रोन कोसळलं होतं. यानंतर जवळपास 500 हून अधिक ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

अमृतसर येथील एका शेतात टिफिन बॉम्ब आढळल्यानंतर पंजाबमधील सीमा पोलीस हाय अलर्टवर आहे. गुरदासपूरचे एसएसपी नानक सिंह त्यांच्या कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत होते. दरम्यान कलानौर उपविभागातील एका गावात एक मोठं हेलिकॉप्टर 10-15 मिनिटं आकाशात घिरट्या घालून खाली पडलं असल्याची माहिती मिळाली. ही घटना समोर येताच आसपासच्या गावातील असंख्य लोकं घाबरुन गेले होते.

हेही वाचा- तालिबाननं आणखी तीन शहरांवर मिळवला ताबा; दीड लाख लोकांची होरपळ

द ट्रिब्यूननं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित ड्रोन भारतीय हवाई दलाचं असल्याचं समोर आलं आहे. जम्मूहून भारतीय हवाई दल एका रिमोटद्वारे या ड्रोनला नियंत्रित करत होते. गुरुदासपूरचे एसएसपी आपल्या टीमसह मालो गिल गावात पोहोचल्यानंतर, त्यांना कळलं की संबंधित ड्रोन पाकिस्तानी नसून भारतीय हवाई दलाचं आहे. या ड्रोनवरील नियंत्रण गमावल्यामुळे हा अपघात घडला आहे. हा अपघातग्रस्त ड्रोन पाहण्यासाठी याठिकाणी जवळपास पाचशेहून अधिक जणांनी गर्दी केली होती. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना बराच प्रयत्न करावा लागला.

हेही वाचा-भारतानं बनवलेल्या महामार्गावर तालिबानचा ताबा; 300 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक धोक्यात

यानंतर, लोकांमध्ये पसरलेली अफवा दूर करण्यासाठी अर्धा डझनभर पीसीआर वाहनं आणि मोटार सायकलीवरून गावांगावात जाऊन पोलिसांनी लोकांना अचूक माहिती दिली आहे. त्यानंतर गावातील दहशतीचं वातावरण निवळलं आहे. अवजड शस्त्र वाहून नेण्याची क्षमता नसल्यानं हा ड्रोन अपघात झाला असावा, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

First published:

Tags: Panjab