• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • ...अखेर पाकिस्तान आला वठणीवर; भारतासोबत व्यापार करण्यास मंजुरी

...अखेर पाकिस्तान आला वठणीवर; भारतासोबत व्यापार करण्यास मंजुरी

India-Pakistan Trade: गेल्या 19 महिन्यांपासून दोन्ही देशातील व्यवहार ठप्प होते. काश्मीरला स्वायत्त दर्जा देणारं कलम 370 भारताने रद्द केल्याने पाकिस्तानच्या नाकाला मिरच्या झोंबल्या आणि त्यांनी व्यापार बंद केला होता.

 • Share this:
  नवी दिल्ली, 31 मार्च: पाकिस्तानकडून सीमेवर होण्याऱ्या कुरापतीमुळे भारताचे पाकिस्तानसोबत संबंध ताणले (India Pakistan Relations) गेले. त्याचबरोबर 2019 साली जम्मू काश्मीरमधून (Jammu Kashmir latest news) कलम 370 (Artical 370) रद्द  केल्यानंतर पाकिस्तानला सर्वात जास्त मिरच्या झोंबल्या. त्यामुळे पाकिस्तानने भारतासोबत देवाणघेवाण (India-Pakistan Trade) बंद केली होती. त्याचबरोबर पुलवामा हल्ल्यानंतर (Pulwama Attack) भारताने पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 200 टक्के आयात शुल्क लावलं होतं. त्यामुळे दोन्ही देशातील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाला होता. गेल्या 19 महिन्यांपासून दोन्ही देशातील व्यवहार ठप्प होते. मात्र याचा थेट फटका पाकिस्तानला बसला आहे. त्यामुळे अहंकारातून जागा झालेल्या पाकिस्तानने (Pakistan) भारतासोबत पुन्हा व्यवहार करण्यास मंजुरी दिली आहे. पाकिस्तानात कापूस आणि साखरेच्या (Cotton And Sugar) कमतरतेमुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. पाकिस्तानमधील इमरान सरकारने भारतासोबत (India) व्यापार करण्यास मंजुरी दिली आहे. आता पाकिस्तानातील व्यापाऱ्यांना जून 2021 पर्यंत भारतातून कापूस आयात करता येणार आहे. त्याचबरोबर साखरेच्या आयातीवरही लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

  'मोदी, इम्रान खानसोबत लंडनमध्ये जेवण करणार', भाजपा खासदाराची खरमरीत टीका

  यापूर्वी पाकिस्तानने मे 2020 साली भारतातून आयात होणारी औषधं आणि कच्च्या मालावरील प्रतिबंध हटवले होते. कोरोना महामारीचा प्रकोप पाहता पाकिस्तानने हा निर्णय घेतला होता. कोरोनाचा सामना करण्यासाठी आणि पाकिस्तानातील जनतेचं हित लक्षात घेत तेव्हा इमरान सरकारने हा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकर बरे व्हा अशी प्रार्थना केली होती. तसेच पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर बाजवा यांनी भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी पावलं उचलण्याची गरज असल्याचं म्हंटलं होतं. आता इमरान सरकारच्या या निर्णयानंतर दोन्ही देशातील संबंध भविष्यात सुधारतील का? याकडे लक्ष लागून आहे.
  Published by:News18 Digital
  First published: