इम्रान यांना ट्रम्प यांचा दणका, 'काश्मिरी मुस्लिमांचा कळवळा पण चीनमधल्या विगर मुस्लिमांचं काय?'

इम्रान यांना ट्रम्प यांचा दणका, 'काश्मिरी मुस्लिमांचा कळवळा पण चीनमधल्या विगर मुस्लिमांचं काय?'

पाकिस्तानला काश्मीरमधल्या मुस्लिमांचा एवढा कळवळा आहे, मग चीनमधल्या मुस्लिमांवर एवढे अत्याचार होत आहेत, त्याचं काय, असं अमेरिकेने पाकिस्तानला विचारलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य आशिया विभागाच्या सचिव अ‍ॅलिस वेल्स यांनी पाकिस्तानवर टीका केली.

  • Share this:

न्यूयॉर्क, 27 सप्टेंबर : पाकिस्तानला काश्मीरमधल्या मुस्लिमांचा एवढा कळवळा आहे, मग चीनमधल्या मुस्लिमांवर एवढे अत्याचार होत आहेत, त्याचं काय, असं अमेरिकेने पाकिस्तानला विचारलं आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य आशिया विभागाच्या सचिव अ‍ॅलिस वेल्स यांनी पाकिस्तानवर टीका केली. चीनमधला मुस्लीम समुदाय भीषण स्थितीत राहतो आहे पण पाकिस्तान कधीही चीनविरुद्ध काहीच बोलत नाही, असं त्या म्हणाल्या.

चीनमध्ये झिंजियांग प्रांतात 10 लाख विगर मुस्लिमांना बंदी बनवण्यात आलं आहे हे त्यांनी लक्षात आणून दिलं. चीन आणि पाकिस्तान हे एकमेकांचे सहकारी आहेत. 'जैश ए मोहम्मद' चे प्रमुख मसूद अजहर आणि हाफिज सईद यांच्यावर निर्बंध घालण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला. त्याचबरोबर चीन पाकिस्तानला आर्थिक मदत करतं. त्यामुळे पाकिस्तान चीनविरुद्ध बोलत नाही हेच त्यांनी सुचवलं.

चीनमधले विगर मुस्लीम

चीनने झिजियांग प्रांतामध्ये या अल्पसंख्याक विगर मुस्लीम लोकांसाठी एक वसाहतच बनवली आहे. या वसाहतीत त्यांना बंदिवासात ठेवण्यात आलं आहे. पण ही वसाहत म्हणजे प्रशिक्षण केंद्र आहे, असा चीनचा दावा आहे.चीनमधले हे विगर मुस्लीम लोक तुर्की भाषा बोलतात आणि ते मध्य आशियाई देशांशी आपलं नातं मानत आले आहेत.याबद्दल याआधी इम्रान खान यांना याबद्दल विचारण्यात आलं होतं.

(हेही वाचा : दींच्या UN मधल्या भाषणात पाकिस्तानचं नाव नाही, अनुल्लेखाने मारलं)

चीन आणि पाकिस्तानमध्ये व्यावहारिक संबंध असल्याने तुम्ही या प्रश्नावर मौन बाळगलं आहे का, असंही इम्रान खान यांना विचारण्यात आलं. त्यावर इम्रान खान म्हणाले, मी एवढंच सांगू शकतो की पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी चीन म्हणजे ताजीतवानी हवा आहे. त्यांनी आम्हाला खूप मदत केली आहे.विगर मुस्लिमांच्या बद्दल जर काही बोलायचंच असेल तर मी प्रसारमाध्यमांशी न बोलता थेट चीनशी बोलेन, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

झिंजियांग प्रांतात अल्पसंख्याक विगर मुस्लीम आणि हान चिनी लोकांमध्ये वर्षानुवर्षं संघर्ष सुरू आहे. या संघर्षात शेकडो मुस्लीम लोक मारले गेले आहेत. या विगर मुस्लीम लोकांच्या फुटीरवादी कारवायांमुळे चीनमध्ये अशांती आहे, आहे, असं चीनचं म्हणणं आहे तर विगर मुस्लीम लोकांच्या धर्म आणि संस्कृतीवर चिनी आक्रमण होतं आहे, अशी या मुस्लिमांची तक्रार आहे.

==========================================================================================

VIDEO : अजितदादांच्या राजीनाम्याचं हे आहे कारण, खुद्द शरद पवारांनी केलं स्पष्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 09:51 PM IST

ताज्या बातम्या