मराठी बातम्या /बातम्या /देश /

गुप्तचरांकडून मिळाली मोठी बातमी! पूर्वेकडूनही आता पाकिस्तानी सैनिकांचा धोका; चीनच्या लष्करात होतायत सामील

गुप्तचरांकडून मिळाली मोठी बातमी! पूर्वेकडूनही आता पाकिस्तानी सैनिकांचा धोका; चीनच्या लष्करात होतायत सामील

Intelligence च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीनच्या लष्करात पाकिस्तानी अधिकारी सामील होत आहेत. पाकिस्तान आणि चीनमध्ये झालेल्या एका लष्करी करारामुळे आपल्याला पूर्व भागातूनही पाकिस्तानी सैनिकांचा सामना करावा लागणार आहे.

नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर: देशाच्या पश्चिम, उत्तर आणि वायव्य सीमेवर पाकिस्तानी घुसखोरांचा धोका असतो. तिथे तैनात पाक सैनिक सतत कुरबुरी करत असतात. पण आता तुलनेने सुरक्षित पूर्व सीमेवरही पाकिस्तानच्या हलचाली वाढल्या आहेत. या सीमेवर आपल्याला चिनी सैनिकांना तोंड द्यावं लागतं. पण आता पाकिस्तान आणि चीनमध्ये झालेल्या एका लष्करी करारामुळे आपल्याला पूर्व भागातूनही पाकिस्तानी सैनिकांचा सामना करावा लागणार आहे. पाकिस्तानी लष्करी अधिकारी (Pakistan Army officers in Chinese troops) चीनच्या सैन्यामध्ये भरती केले जात आहेत, अशी माहिती गुप्तचर (Intelligence) यंत्रणांच्या सूत्रांकडून समजली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या वेस्टर्न थिएटर कमांड (Chinese western theatre command) आणि सदर्न थिएटर कमांडमध्ये (Chinese southern theatre command) पाकिस्तानी संपर्क अधिकाऱ्यांची (Pakistani liaison officers) नियुक्ती केली गेली आहे. चीनचं वेस्टर्न थिएटर कमांड भारताच्या सीमेला लागून आहे. याठिकाणी गेल्याच महिन्यात चीनने जनरल वांग हैजियांग यांची कमांडर म्हणून नियुक्ती केली होती. विशेष म्हणजे, भारत आणि चीनमध्ये सीमेवरून सैन्य मागे हटवण्याबाबत करार झाला असूनही वेस्टर्न थिएटर कमांडमधून मोठ्या प्रमाणात चिनी सैनिक पूर्व लडाख भागामध्ये तैनात केले जात आहेत. सरकारी सूत्रांकडून न्यूज18ला याबाबत माहिती मिळाली आहे. चिनी सैन्याचे सदर्न थिएटर कमांड हे मकाउ आणि हाँगकाँगसोबत इतर काही भागावर नियंत्रण ठेवतं.

चिनी लष्कराच्या सेंट्रल मिलिट्री कमिशनच्या (China central ministry commission) जॉइंट स्टाफ विभागात, तसंच राज्य सुरक्षा मंत्रालयातही (Ministry of State Security) पाकिस्तानचे कर्नल रँकचे अधिकारीही नियुक्त झाले आहेत. याबाबत गुप्तचर यंत्रणांनी माहिती दिली आहे. सेंट्रल मिलिट्री कमिशन हे युद्ध रणनीती, सराव आणि यासंबंधी गोष्टींचा निर्णय घेतं. यासोबतच, लष्कराव्यतिरिक्त आणखी दहा पाकिस्तानी अधिकाऱ्यांची बीजिंगमधल्या पाकिस्तानी दूतावासात (Pakistan Embassy in China) नियुक्ती करण्यात आली आहे. यातूनच चीन आणि पाकिस्तानची जवळीक वाढत चालल्याचं दिसून येत आहे.

चीनचे अधिकृत वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समधल्या वृत्तानुसार, हेरगिरी आणि लष्करासंबंधी सर्व निर्णय हे चीनच्या राज्य परिषदेअंतर्गत येणाऱ्या राज्य सुरक्षा मंत्रालयाकडून घेण्यात येतात. ‘डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्रामध्ये 2016 साली प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका वृत्तानुसार, पाकिस्तानने नऊ हजार सैनिक आणि सहा हजार पॅरा मिलिट्री सैनिकांची एक विशेष डिव्हिजन तयार केली होती. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या (CPEC) सुरक्षेसाठी ही डिव्हिजन तयार करण्यात आली होती. तसंच, 2019 मध्ये पाकिस्तानने असं म्हटलं होतं, की चीनच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि सीपीईसीच्या प्रकल्पांसाठी ते सैनिकांच्या विशेष तुकड्या तयार करत आहेत.

एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं न्यूज18ला सांगितलं, की या सर्व घडामोडींवर भारत पूर्ण लक्ष ठेवून आहे. या दोन्ही देशांच्या लष्करांना एकमेकांची मोठ्या प्रमाणात मदत होणार असल्याचंही या अधिकाऱ्यानं म्हटलं आहे.

First published:

Tags: India china, Pakistan, Pakistan army