तिरुवअनंतपुरम, 9 डिसेंबर : केरळमधील (Kerala) अलाप्पुझा जिल्ह्यातील थाकाझी पंचायत (Thakazhy Panchayat) मधून बर्ड फ्लूचा (Bird Flu) प्रसार झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. सांगितलं जात आहे की, पुरक्कडमधून पाठवण्यात आलेल्या बदकांमध्ये बर्ड फ्लू असल्याची पुष्टी झाली आहे. याबाबत सूचना मिळताच अधिकाऱ्यांनी प्रभावित भागात एक किलोमीटरपर्यतच्या भागातील बदके, कोंबड्या आणि घरेलू पक्षांना मारण्याचे आदेश दिले आहेत. फ्लूच्या (Bird Flu Outbreak) प्रकोपाची सूचना मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी पशूपालन, आरोग्य आणि पोलिस विभागातील अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली. बैठकीनंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की, प्रशासनाने थाकाझी ग्राम पंचायत वॉर्ड क्रमांक 10 जवळील एक किमी भागातील सर्व बदके, कोंबड्या आणि घरेलू पक्षांना मारण्याचे आदेश दिले. संक्रमण पसरू नये म्हणून प्रशासनाकडून हे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी फ्लू संभावित भागातील कोंबड्या, बदके आणि पक्षांचे अंडे, मांस आदीच्या विक्रीवर रोख आणला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाने चंपाकुलम, नेदुमुडी, मुत्तर, वियापुरम, करुवट्टा, थ्रीकुन्नपुझा, थकाझी, पुरक्कड़, अंबालापुझा दक्षिण, अंबालापुझा उत्तर हरिप्पड नगरपालिका भागात प्रतिबंध लावण्यात आले आहेत. यासोबतच प्रशासनाने या भागातील पक्ष्यांना पकडणे आणि त्यांना नष्ट करण्यासाठी पशूपालन विभागाची एका टीमचं गठण केलं आहे. हे ही वाचा- Omicron कोरोनाच्या इतर स्ट्रेनपेक्षा आहे वेगळा, या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष नुकतेच मध्य प्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यातून कमीत कमी 48 कावळे मृत अवस्थेत आढळल्यानंतर यात एच5 एन8 व्हायरस म्हणजेच बर्ड फ्लूची पुष्टी झाली होती. याशिवाय राजस्थानमधील नागोर जिल्ह्यातूनही बर्ड फ्लूची प्रकरणं समोर आली आहेत. ज्यात 5 दिवसात 60 हून अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.