बिस्किटाचं डिझाइन चोरलं म्हणून या प्रसिद्ध विदेशी कंपनीने देशी 'पार्ले जी'ला खेचलं कोर्टात

बिस्किटाचं डिझाइन चोरलं म्हणून या प्रसिद्ध विदेशी कंपनीने देशी 'पार्ले जी'ला खेचलं कोर्टात

Parle Vs Oreo: पार्ले ही बिस्कीट व्यवसायातील देशातली अग्रगण्य कंपनी आहे. गेली 8 दशकं ते या व्यवसायात आहेत.

  • Share this:

मुंबई, 1 मार्च : गेली 80 वर्षं भारतीयांच्या जिभेचे बिस्किट चोचले पुरवणारी प्रसिद्ध कंपनी पार्ले जीविरुद्ध (Suit against Parle G) दिल्ली उच्च न्यायालयात केस दाखल केली आहे. हे प्रकरण बिस्किटांच्या डिझाइनशी संबंधित आहे. पार्लेजीनं आमचं बिस्किटांचं डिझाइन चोरलं म्हणून केस दाखल झाली आहे, तीही जगप्रसिद्ध कंपनीने. भारतात बिस्किटांच्या डिझाईनच्या कॉपीबाबत पूर्वीपासून विविध कंपन्यांची बरीच प्रकरणं कोर्टात गेलेली आहेत. ओरिओ बिस्किटं बनवणारी प्रसिद्ध कंपनी मॉण्डेलीझ इंटरनॅशनलने (Mondelez international) पार्लेविरोधात  (parle Vs Oreo) दावा ठोकला आहे.

दिल्ली उच्च न्यायालयात होईल सुनावणी

ओरियोनं दावा केला आहे, की पार्ले फॅबियो (parle fabio) बिस्किटाचं डिझाईन तंतोतंत त्यांच्या ओरियोसारखं आहे. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं 12 एप्रिलला सुनावणी करण्याचा निर्णय  आहे. अमेरिकेच्या मॉण्डेलीज इंटरनॅशनलचं युनिट असलेल्या इंटरकॉन्टिनेंटल ग्रेट ब्रँड्सनं ट्रेडमार्कचं उल्लंघन झाल्याचं प्रकरण दाखल केलं. (parle G biscuit design copy case) ही माँडेलीझ तीच प्रसिद्ध कंपनी आहे, ज्यांनी कॅडबरीचा ब्रँडही विकत घेतला आहे.

9 फेब्रुवारीला या प्रकरणात सुनावणी झाली. हायकोर्टानं ओरियोच्या वकिलाची तातडीनं सुनावनी घेण्याबाबतचं अपील फेटाळून लावलं. आणि पुढची सुनावणी एप्रिलमध्येच होईल असं सांगितलं. (parle G Fabio design Oreo copy)

10 वर्षांपूर्वी लॉन्च झालं होतं ओरियो

मॉण्डेलीझनं भारतात  जवळपास 10 वर्षांपूर्वी ओरिओ लाँच केलं होतं. पार्लेनं मागच्या वर्षी जानेवारीत फॅबिओ या प्रॉडक्ट लॉन्च केला होता. ओरियोनं आतापर्यंत या ब्रँडच्या सर्व प्रकारांना लॉन्च केलं आहे. यात चोको क्रीम, ओरियो व्हॅनिला ऑरेंज, क्रीम आणि स्ट्रॉबेरी आहेत. (Oreo files case against Parle)

पार्लेची प्रीमियम सेगमेंटमध्ये एंट्री

खरं पाहिल्यास देशात पारले जी एकदम स्वस्त आणि ग्लुकोज बिस्किटांसाठी ओळखला जातो. ग्रामीण भागात याला मोठी मागणी आहे. मात्र मागच्या 10-15 वर्षात शहरी भागात पारलेचा प्रीमियम बिस्किटांशी संघर्ष होतो आहे. विशेषतः ब्रिटानिया, मॉण्डेलीझ, आयटीसी अशा कंपन्यांनी शहरी भागात प्रीमियम बिस्किटांवर फोकस केला आहे. हेच कारण आहे, की पारलेनंसुद्धा या प्रीमियममध्ये आपली स्थिती बळकट बनवण्यासाठी अशा महाग बिस्किटांच्या सेगमेंटमध्ये पाऊल ठेवलं आहे. (parle Delhi high court Oreo case)

हेही वाचा 'चिंध्यांसारखा ब्लाऊज घालून...', कंगनाने दीपिका पादुकोणला पुन्हा केलं टार्गेट

ब्रिटानियानं फ्युचर कन्झ्युमरविरुद्ध कोर्टात केस दाखल केली होती

मागच्या वर्षी ब्रिटानिया इंडस्ट्रीजनं फ्युचर कन्झ्युमरविरुद्ध कोर्टात केस दाखल केली होती. ब्रिटानियानं आरोप केला होता, की फ्युचर कन्झ्युमर त्याच्या सर्व पॅकेजिंगची कॉपी करत आहे. ब्रिटानियानं  फ्युचर कन्झ्युमरनं गुड टाईमचा उपयोग करण्याबाबतही आक्षेप नोंदवला होता. आयटीसीविरुद्धही ब्रिटानियानं अशाच केसेस दाखल केलेल्या आहेत.

हेही वाचा भन्नाट ऑफर! सोशल मीडियावर Selfie अपलोड करा आणि मोबाईल फोन मिळवा

1928 मध्ये पार्लेची सुरवात

1928 मध्ये 'हाऊस ऑफ पार्ले'ची सुरवात झाली. मालक मोहन दयाल चौहान यांनी वयाच्या 18 व्या वर्षी कपड्यांच्या उद्योगातून आपलं करियर सुरू केलं. पुढे ते बिस्किटांच्या उद्योगात उतरले. आज देशात पारले-जीजवळ जवळपास 130 हून जास्त फॅक्टरीज आहेत. शिवाय 50 लाख रिटेल स्टोअर्स आहेत. दर महिन्याला पार्ले-जी 1 अब्ज बिस्किटांचं उत्पादन करते.

Published by: News18 Desk
First published: March 3, 2021, 10:10 PM IST

ताज्या बातम्या