भन्नाट ऑफर! सोशल मीडियावर Selfie अपलोड करा आणि मोबाईल फोन मिळवा

भन्नाट ऑफर! सोशल मीडियावर Selfie अपलोड करा आणि मोबाईल फोन मिळवा

सोशल मीडियावर Selfie अपलोड करून मोबाईल मिळवण्यासाठी तुमच्या हातात फक्त 14 दिवस आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 मार्च : सेल्फी (Selfie) काढायला कुणाला आवडत नाही. तुम्हीदेखील आपल्या मोबाईलमधून (smartphone) असे बरेच सेल्फी काढत असाल पण आता हाच सेल्फी तुम्हाला स्मार्टफोन मिळवून देणार आहे. तुम्हाला फक्त सोशल मीडियावर तुमचे सेल्फी अपलोड करायचे आहेत आणि त्या बदल्यात रिटर्न गिफ्ट म्हणून तुम्हाला सॅमसंगचा स्मार्टफोन मिळणार आहे. ही भन्नाट ऑफर दिली आहे उत्तर दिल्ली महापालिकेनं (North MCD) ही भन्नाट ऑफऱ दिली आहे.

जनतेला स्वच्छ सर्वेक्षण - 2021 (Swachh Survekshan-2021) मध्ये जोडण्यासाठी उत्तर दिल्ली महापालिकेनं प्रयत्न सुरू केले आहेत आणि याचाच एक भाग म्हणून ही अनोखी ऑफर देण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत लोकांना आपल्या सहा कामांचे सेल्फी फेसबुक  (Facebook), टि्वटर (Twitter) आणि इन्स्टाग्राम  (Instagram) या सोशल मीडियावर पोस्ट करायचे आहेत. त्यानुसार जे गुण मिळतील त्या आधारावर नॉर्थ दिल्ली महापालिका विजेत्यांना सॅमसंग फोन बक्षीस म्हणून देणार आहे.

हे वाचा - मोफत चंद्रावर जाण्याची संधी; फक्त पूर्ण कराव्या लागतील या 2 अटी

उत्तर दिल्लीचे महापौर जयप्रकाश (Mayor Jai Prakash) यांनी करोल बाग विभागातील स्वच्छ सर्वेक्षण - 2021 च्या   #14 दिवसांच्या चॅलेंजमध्ये भाग घेतला आहे. नागरिकांसाठी  #14 दिवसांचं चॅलेंज ही एक मोहीम सुरू केली. सोशल मीडियावर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. ज्या अंतर्गत सहा कामं करताना आपले सेल्फी शेअर करायचे आहेत.

या कामांमध्ये घरात ओला, सुका आणि घातक कचरा वेगवेगळा ठेवणं, ओला कचऱ्यापासून घरीच खत तयार करणं, प्रतिबंधित प्लॅस्टिकचा वापर टाळणं, कमीत कमी कचरा करणं, कचऱ्याचा पुनर्वापर करणं, एक झाड लावणं आणि विविध ठिकाणी लागलेल्या स्वच्छ सर्वेक्षण - 2021 च्या लोगोसह सेल्फी काढणं याचा समावेश आहे. नागरिकांनी आपले स्वच्छतासंबंधी सेल्फी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर # 14dayschallenge, #Swacchdelhi या हॅशटॅगसह  @North DMC या @kbzdc, @ kzzdc1 आणि @KBZ Dc या ट्विटर अकाऊंटला टॅग करायचे आहेत.

हे वाचा - सावधान! 2050 पर्यंत ऐकण्याची क्षमता होणार कमी; WHOचा इशारा

प्रत्येक कार्य पूर्ण करून नागरिक 14 दिवसांपर्यंत आपले फोटो सोशल मीडियावर अपलोड करू शकता. प्रत्येक कार्याला 10 गुण दिले जाणार आणि फोटोवरील प्रतिक्रिया पाहून त्यावर इतर गुण दिले जाणार. कोणताही नागरिक हे स्वच्छतेचं आवाहन स्वीकारून # 14 दिवसांच्या चॅलेंजमध्ये सहभागी होऊन आकर्षक पुरस्कार जिंकू शकतो. विजेत्याला सॅमसंग फोनशिवाय इतर पुरस्कारही दिला जाईल. आकर्षक पुरस्कार जिंकण्यांसाठी त्यांना  14 दिवसांच्या स्वच्छता चॅलेंजमध्ये सहभागी व्हावं लागेल, असंही महापौरांनी सांगितलं.

Published by: Priya Lad
First published: March 3, 2021, 7:36 PM IST

ताज्या बातम्या