मराठी बातम्या /बातम्या /देश /

UP Opinion Poll: भाजप सत्ता राखण्याचा अंदाज, कुठल्या पक्षाला किती जागा? वाचा सविस्तर

UP Opinion Poll: भाजप सत्ता राखण्याचा अंदाज, कुठल्या पक्षाला किती जागा? वाचा सविस्तर

उत्तर प्रदेश निवडणुकीत सध्या तरी भारतीय जनता पक्षाचं पारडं जड असल्याचं ओपनियन पोलमधून दिसून येत आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकीत सध्या तरी भारतीय जनता पक्षाचं पारडं जड असल्याचं ओपनियन पोलमधून दिसून येत आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकीत सध्या तरी भारतीय जनता पक्षाचं पारडं जड असल्याचं ओपनियन पोलमधून दिसून येत आहे.

  • Published by:  desk news

लखनऊ, 17 जानेवारी: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचं (UP Assembly Elections) वेळापत्रक (Time Table) जाहीर झाल्यानंतर आता विविध माध्यमसंस्था आणि सर्वेक्षण गटांनी केलेले ओपिनियन पोल (Opinion Poll) जाहीर होत आहेत. सध्या उत्तर प्रदेशातील राजकीय पक्ष हे आपल्या उमेदवारांच्या नावाच्या याद्यांना अंतिम रुप देण्यात गुंतले आहेत. राजकीय प्रचाराची रणनिती निश्चित केली जात असून देशातील सर्वात मोठ्या राज्यात कोण बाजी मारणार, हा प्रश्न विचारला जात आहे. 

असा आहे ओपिनियन पोलचा अंदाज

‘इंडिया टीव्ही’नं केलेल्या ओपिनियन पोलनुसार भाजपला उत्तर प्रदेशात 230 ते 235 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात एकूण 403 विधानसभेच्या जागा आहेत. बहुमतासाठी आवश्यक असणारा जादूई आकडा आहे 202. हा आकडा भाजप सहज पार करेल आणि 230 ते 235 च्या घरात पोहोचेल, असा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. 

समाजवादी पक्षाला 160 ते 165 जागा

उत्तर प्रदेशात प्रमुख विरोधी पक्ष म्हणून समाजवादी पार्टी निवडून येईल, असा अंदाजही ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. याचाच अर्थ भाजपच्या तुलनेत समाजवादी पक्ष हा पिछाडीवर असेल आणि सपानं निवडणुकीत आव्हान निर्माण केलं असलं तरी भाजपला सत्तेपासून रोखण्यात सपाला यश येणार नाही, असा अंदाज या ओपिनियन पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेसला उत्तर प्रदेशात 3 ते 7 जागा तर बसपाला 2 ते 5 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

पूर्वांचलमध्ये भाजपला फटका

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक फटका हा पूर्वांचल भागात बसेल, असा अंदाजही ओपिनियन पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. पूर्वांचलात असणाऱ्या एकूण 144 जागांपैकी भाजप 66 जागा जिंकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर समाजवादी पक्ष 51, बसपा 2 तर काँग्रेस 3 जागा जिंकेल, असा अंदाज या ओपिनियन पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. 

'रिपब्लिक'चा ओपिनियन पोल

रिपब्लिक भारत आणि पी-मार्क यांनी केलेल्या ओपनियन पोलनुसार भाजपला 252 ते 272 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर समाजवादी पक्षाला 111 ते 131 जागा मिळण्याचा अंदाज आहे. बहुजन समाज पक्षाला 8 ते 16 जागा, तर काँग्रेसला 0 ते 4 जागा मिळण्याचा अंजा आहे.

एबीपी-सी व्होटरचा अंदाज

एबीपी आणि सी-व्होटर यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार भाजपला 223 ते 235 जागा मिळतील. सपाला 145 ते 157 जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर बसपाला केवळ 8 ते 16 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये वर्तवण्यात आलेल्या अंदाजापेक्षा भाजपचं मतदान वाढेल, असा अंदाजही या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे.

योगींचा गोरखपूरमधून मोठा विजय

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गोरखपूर विधानसभा मतदारसंघातून घवघवीत यश मिळेल, असंही या ओपिनियन पोलमधील अंदाजातून समोर येत आहे. 1998 सालापासून योगी आदित्यनाथ गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून येत असून त्यांचा या भागात चांगलाच प्रभाव आहे.

सपाचं आव्हान

भाजपला सध्या केवळ समाजवादी पक्षाचंच आव्हान असल्याचं या ओपिनियन पोलमधून स्पष्ट होत आहे. काँग्रेस आणि बसपा हे स्पर्धेतून पूर्णतः बाहेर फेकले गेले असून मतदानापर्यंत काय घडामोडी घडतात, यावरून निवडणुकीचा निकाल ठरणार आहे.

First published:

Tags: BJP, Election, Poll, SP, Uttar pardesh, काँग्रेस