तुम्ही किराणा आणि भाजीपाला ऑनलाइन मागवता का? भारतात हे मार्केट वाढणार दुपटीनं

तुम्ही किराणा आणि भाजीपाला ऑनलाइन मागवता का? भारतात हे मार्केट वाढणार दुपटीनं

तुम्ही तुमच्या घराचं वाणसामान कसं भरता ? घरात लागणारा भाजीपाला कुठून आणता ? सध्याच्या ऑनलाइन युगात या पद्धती आता खूप हायटेक झाल्या आहेत. या ऑनलाइन मार्केटमध्ये भारत आघाडीवर आहे.

  • Share this:

सिंगापूर, 8 जुलै : तुम्ही तुमच्या घराचं वाणसामान कसं भरता ? घरात लागणारा भाजीपाला कुठून आणता ? सध्याच्या ऑनलाइन युगात या पद्धती आता खूप हायटेक झाल्या आहेत. याआधी किराणा सामानाची यादी वाण्याकडे देऊन सामान मागवणं किंवा मंडईत जाऊन भाजी आणणं हे आता जुनं झालं. आता जमाना ऑनलाइनचा आहे आणि अ‍ॅमेझॉनसारख्या कंपन्या यामध्ये आघाडीवर आहेत.

सिअ‍ॅटलमधल्या एका गॅरेजमध्य सुरुवात करून अ‍ॅमेझॉनसारखी कंपनी जगातली सगळ्यात मोठी इ कॉमर्स कंपनी कशी बनली याबदद्लची कथा खूपच रंजक आहे. याच अ‍ॅमेझॉन कंपनीसाठी भाजीपाला आणि किराणा सामानाचा ऑनलाइन व्यापार सोपा असेल, असं आपल्याला वाटेल पण तसं नव्हतं.

अ‍ॅमेझॉन फ्रेश

भाजीपाल्यासारख्या नाशवंत मालाचा व्यापार करण्यामध्ये अनेक आव्हानं होती. त्यामुळे अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बोझेस हेही यात हात घालत नव्हते. पण 2007 मध्ये त्यांनी अ‍ॅमेझॉन फ्रेश लाँच केलं आणि या ऑनलाइन मार्केटचा नजारा बदलला. यासाठी देशभरामध्ये फळं आणि भाज्या गोठवून चांगल्या ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटर्सचीही आवश्यकता होती. त्यासाठी वेब डिझाइनही गरजेचं होतं.

काँग्रेस-जेडीएसच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे, आमदाराच्या अपहरणाचा भाजपवर आरोप

किराणा सामान आणि भाजीपाला या उद्योगात कमी नफा मिळतो. त्याचमुळे याआधी या ऑनलाइन व्यापारात मोठमोठ्या कंपन्यांचेही हात पोळले आहेत. पण अ‍ॅमेझॉनने मात्र अत्यंत सावधपणे हा व्यवसाय वाढवला.

अमेरिकेप्रमाणेच आशियातही वाढ

अमेरिकेमध्ये जीवनावश्यक वस्तंचा ऑनलाइन व्यापार फोफावतो आहे आणि आता आशियासुद्धा यात मागे नाही. जुलै महिन्यातच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, आशियामधल्या बहुतांश देशांत किराणा सामान आणि फळभाज्यांच्या ऑनलाइन व्यापारात चांगलीच वाढ झाली आहे. आशियामध्ये हाच व्यापार 2023 पर्यंत दुपटीने वाढण्याचा अंदाज आहे. भारत, चीन, तैवान, दक्षिण कोरिया, जपान, इंडोनेशिया, थायलंड, सिंगापूर हे देश ऑनलाइन ग्रोसरी मार्केट म्हणूनच ओळखले जातात.

छोटे व्यापारीही महत्त्वाचे

पायाभूत संरचनांचा विकास, पैसे देण्याच्या आधुनिक पद्धती आणि जास्त लोकसंख्या यामुळे भारतात हे मार्केट दिवसेंदिवस वाढणारच आहे. अ‍ॅमेझॉन, वॉलमार्ट, अलिबाबा या कंपन्या म्हणूनच भारतात हा व्यापार करण्यासाठी उत्सुक आहेत.

असं असलं तरी यामुळे स्थानिक घाऊक व्यापाऱ्यांच्या हिताला बाधा येणार नाही यावरही सरकारचं लक्ष आहे. यासाठी काही नियमावली तयार करण्याचाही सरकारचा विचार आहे. ऑनलाइन व्यापारामध्ये ग्राहकांचं हित आणि मालाची गुणवत्ताही महत्त्वाची आहे. त्यामुळे भारतात वाढणाऱ्या या ऑनलाइन मार्केटला प्रोत्साहनच मिळतं आहे.

=========================================================================================================

VIDEO: निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, राज ठाकरे दिल्ली दरबारी

First published: July 8, 2019, 3:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading