एकतर्फी प्रेमातून नववधूची लग्नाच्याच दिवशी हत्या, ब्यूटी पार्लरमध्ये घुसून चिरला गळा

एकतर्फी प्रेमातून नववधूची लग्नाच्याच दिवशी हत्या, ब्यूटी पार्लरमध्ये घुसून चिरला गळा

कोठारी रिसोर्टमध्ये विवाहाची संपूर्ण तयारी झाली होती. नववधू सोनू ही सकाळीच आपल्या नातेवाईकांसोबत शाजापूर येथून जावरा येथे आली होती.

  • Share this:

सुधीर जैन(प्रतिनिधी),

रतलाम, 5 जून: रतलाम जिल्ह्यातील जावरा येथे रविवारी दिवसाढवळ्या नववधूचा गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. हत्येनंतर आरोपी पसार झाला आहे.

नववधू मेकअप करण्यासाठी ब्यूटी पार्लरमध्ये गेली होती. या दरम्यान एका माथेफिरूनं ब्यूटी पार्लरमध्ये घुसून धारदार शस्त्रानं तिचा गळा चिरला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नववधूला तातडीनं जावरा येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

हेही वाचा...संत तुकारामांचं देहू हादरलं, चारित्र्याच्या संशयावरून पतीनं केली पत्नीची हत्या

एकतर्फी प्रेमातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. सोनू कमल सिंह यादव (वय-32) असं मृत नववधूचं नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, शाजापूर येथील रहिवासी सोनू कमल सिंह यादव हिचा विवाह नागदा येथील गौरव याच्याशी आज (रविवारी) होणार होता. कोठारी रिसोर्टमध्ये विवाहाची संपूर्ण तयारी झाली होती. नववधू सोनू ही सकाळीच आपल्या नातेवाईकांसोबत शाजापूर येथून जावरा येथे आली होती. विवाह पूर्वी सोनू मेकअप करण्यासाठी जावरा येथील आंटिया चौकातील एका ब्यूटी पार्लरमध्ये गेली होती. याच वेळी अज्ञात मारेकऱ्यानं सोनूचा गळा चिरुन तिची निर्घृण हत्या केली.

सोनूच्या बहिणीनं सांगितलं की, सोनूचा मेकअप सुरू असताना तिच्या मोबाइलवर एक कॉल आला. एक तरुण बोलत होता. त्यानं त्याचं नाव राहुल असं सांगितलं. त्याला सोनूशी बोलायचं होतं. मात्र, तो बोलत बोलत अचानक ब्यूटी पार्लरमध्ये घुसला आणि काही समजण्याच्या आतच त्यानं सोबत आणलेल्या धारदार शस्त्रानं सोनूचा गळा चिरून फरार झाला.

हेही वाचा...मुंबई हादरली! वाढदिवसाच्या बहाण्याने चार नराधमांकडून 44 वर्षीय महिलेवर गँगरेप

जावरा पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. ब्यूटी पार्लर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू आहे. एका नववधूची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या झाल्यामुळे जावरा शहरात खळबळ उडाली आहे.

First published: July 5, 2020, 3:10 PM IST

ताज्या बातम्या