उदयपूर, 19 फेब्रुवारी : अयोध्यात उभारण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी विश्व हिंदू परिषदेचे (Vishwa Hindu Parishad) आंतरराष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत अशोक सिंघल (Ashok Singhal) यांचे छोटे भाऊ अरविंद सिंघल यांनी 11 कोटी रुपयांचं दोन दिलं आहे. हे राजस्थानमधील (Rajasthan) आतापर्यंतचे सर्वात मोठे दान आहे. अरविंद यावेळी म्हणाले की, मोठ्या भावाचं राम मंदिराचं स्वप्न पूर्ण होत आहे. याचा मला अत्यंत आनंद आहे. विश्व हिंदू परिषदेने केलेल्या राम मंदिर आंदोलनात अशोक सिंघल यांची मोठी भूमिका होती. त्यांनी राम मंदिर उभारणीसाठी अनेक आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं.
अरविंद सिंघल यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी उदयपूरमध्ये दान जमा करीत असलेले पारस सिंघवी यांना दोन वेळा चेकच्या माध्यमातून 11 कोटी रुपयांचा निधी दिला. पहिल्या टप्प्यात त्यांनी पाच कोटी आणि नंतर 6 कोटी रुपयांचा चेक दिला. सिंघवी यांनी सांगितलं की, राजस्थानमध्ये सिंघल कुटुंबाकडून देण्यात आलेलं दान आतापर्यंत राज्यातील सर्वात मोठी रक्कम आहे.
मंदिराच्या भूमी पूजनादरम्यान पंतप्रधानांसोबत सिंघलदेखील होते सहभागी
सिंघल कुटुंबीय राजस्थानमधील उदयपूर भागात राहतात. अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनादरम्यान सिंघल कुटुंबातील सदस्य सलिल सिंघल उपस्थित होते. अशोक सिंघल यांनी राम मंदिरासाठी आंदोलन पुकारलं होतं, ते पाहता राम मंदिर ट्रस्टने या कुटुंबाला आमंत्रण पाठवलं होतं. त्यावेळी अरविंद सिंघल आजारी होते. त्यामुळे त्यांनी सलिल यांना पाठवलं.
हे ही वाचा- काही फूटांवरुन दहशतवाद्यांनी पोलिसांवर झाडल्या गोळ्या; थरारक घटना CCTV मध्ये कैद
खाण आणि विद्युत उपकरणांचा व्यवसाय
वास्तविक अरविंद सिंघल हे राजस्थानचा एक मोठे उद्योगपती आहेत. ते व्हॉल्कन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. खाण क्षेत्राव्यतिरिक्त त्यांची कंपनी विद्युत उपकरणेही तयार करते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashok singhal, Ayodhya ram mandir, India, Narendra modi, Ram mandir donation, VHP