श्रीनगर, 19 फेब्रुवारी : जम्मू आणि कश्मीर स्थित श्रीनगरमध्ये भर दिवसा दहशतवादी हल्ला (Terror Attack) झाल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्रीनगरमधील मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था असलेल्या हवाई मार्गावर बघत भागात शुक्रवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी शहीद झाले. पोलिसांच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दहशतवाद्यांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना खूप जवळून गोळी झाडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये दहशतवाद्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या अत्यंत जवळून येत गोळी झाडली. यावेळी रस्त्यांवर गाड्याही दिसत आहे. शिवाय स्थानिक मंडळीही व्हिडिओत दिवस आहे. येथे जवळच पोलीस स्टेशन असल्याचंही सांगण्यात आलं आहे. या घटनेनंतर पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. येथे पोलिसांनी त्यांना मृत घोषित केलं. शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये कॉन्स्टेबल सोहेल यांचा समावेश आहे. अधिकाऱ्यानी सांगितलं की, सुरक्षा दलांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी अभियान सुरू केलं आहे. गेल्या तीन दिवसांत शहरात हा दुसरा हल्ला आहे. लष्कर-ए-तय्यबाच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
#मुद्दा_गरम_है
— News18 India (@News18India) February 19, 2021
श्रीनगर में आतंकी हमला, लश्कर से जुड़े आतंकी संगठन TRF ने ली हमले की ज़िम्मेदारी#MILITANT #SHRINAGAR #FIRING #TRF @ARPITAARYA pic.twitter.com/WIo9NDEean
हे ही वाचा- स्वतंत्र भारतात महिलेला पहिल्यांदा होणारी फाशी टळणार? पुन्हा केली याचिका यापूर्वीही बुधवारी दहशतवाद्यांनी शहरातील मोठी सुरक्षा व्यवस्था असलेल्या दुर्गानाग भागात एका रेस्तरॉं मालक आणि त्याच्या मुलावर गोळी झाडली होती. यामध्ये दोघे जखमी झाले होते. बुधवारी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वेगवेगळ्या देशांतील राजनयिकांच्या 24-सदस्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी केंद्रशासित प्रदेशात भेट दिली. नेमक्या त्याच दिवशा दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. यानंतर जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. याशिवाय अभियानाअंतर्गत दहशतवाद्यांचा पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे.