मराठी बातम्या /बातम्या /देश /Omicron corona variant: भारतात वेगानं पसरतोय ओमिक्रॉन; 5 राज्यात आढळले 21 रुग्ण

Omicron corona variant: भारतात वेगानं पसरतोय ओमिक्रॉन; 5 राज्यात आढळले 21 रुग्ण

Omicron Variant Latest Update: जगाभरातील 38 देशांमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन व्हेरिएंट (Corona virus omicron variant) आता भारतातही वेगाने पसरत आहे.

Omicron Variant Latest Update: जगाभरातील 38 देशांमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन व्हेरिएंट (Corona virus omicron variant) आता भारतातही वेगाने पसरत आहे.

Omicron Variant Latest Update: जगाभरातील 38 देशांमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन व्हेरिएंट (Corona virus omicron variant) आता भारतातही वेगाने पसरत आहे.

नवी दिल्ली, 06 डिसेंबर: जगाभरातील 38 देशांमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन व्हेरिएंट (Corona virus omicron variant) आता भारतातही वेगाने पसरत आहे. गेल्या अवघ्या 4 दिवसांत भारतात ओमिक्रॉन संक्रमित रुग्णांची संख्या 21 वर पोहोचली (found 21 omicron cases in India) आहे. 2 डिसेंबर रोजी देशात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर 6 डिसेंबरपर्यंत देशात ओमिक्रॉन बाधित 21 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशाची चिंता वाढताना दिसत आहे.

रविवारी दिवसभरात देशात ओमिक्रॉनचे एकूण 17 नवीन रुग्ण आढळले आहेत. यामध्ये राजस्थानातील जयपुरमध्ये  9 रुग्ण, महाराष्ट्रात 7 आणि राजधानी दिल्लीत एका रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं आढळलं आहे. आतापर्यंत, ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग राजधानी दिल्लीसह एकूण 5 राज्यांमध्ये पसरला आहे. राजस्थानमध्ये सर्वाधिक 9 रुग्ण आढळले असून त्यापाठोपाठ महाराष्ट्र 8 (Omicron cases in Maharashtra), कर्नाटकात 2, दिल्ली आणि गुजरातमध्ये प्रत्येक 1 रुग्ण आढळले आहेत.

हेही वाचा-राज्यातील Omicron च्या रुग्णांचा आकडा 8 वर, राजेश टोपे म्हणतात...

विशेष म्हणजे, आतापर्यंत आढळलेले ओमिक्रॉनबाधित सर्व रुग्ण, एकतर नुकतेच दक्षिण आफ्रिकेला जाऊन परत आले होते किंवा रेड लिस्टमधील देशांतून प्रवास केलेल्या लोकांच्या संपर्कात आले होते. सध्या ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू शकते. कारण अनेक संशयितांचे अहवाल येणं बाकी आहे. त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. यासोबतच बाधितांच्या संपर्कात आलेल्या अन्य लोकांचा देखील शोध घेतला जात आहे.

हेही वाचा-'गोळी घाला, नाहीतर फासावर चढवा' पण...; आजोबांचा लस घेण्यास नकार, कारण...

ओमिक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये आढळला होता. त्या दिवशी दोन लोकांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामध्ये एक 66 वर्षीय व्यक्ती होता, जो दक्षिण आफ्रिकेतून दुबईमार्गे भारतात पोहोचला होता. तर दुसरा 46 वर्षीय रुग्ण दक्षिण आफ्रिकेला गेला नव्हता किंवा तेथून परतलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात आला नव्हता. तरीही संबंधित रुग्णामध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग आढळला आहे. त्यामुळे आता देशाची चिंता वाढताना दिसत आहे.

First published:

Tags: Corona spread, Corona virus in india