मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

'गोळी घाला, नाहीतर फासावर चढवा' पण...; आजोबांचा लस घेण्यास नकार, कारण...

'गोळी घाला, नाहीतर फासावर चढवा' पण...; आजोबांचा लस घेण्यास नकार, कारण...

यावेळी आजोबांनी लस न घेण्यामागील दिलेलं कारणही खूप मजेशीर आहे.

यावेळी आजोबांनी लस न घेण्यामागील दिलेलं कारणही खूप मजेशीर आहे.

यावेळी आजोबांनी लस न घेण्यामागील दिलेलं कारणही खूप मजेशीर आहे.

    इंदूर, 5 डिसेंबर : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) अनेक जिल्ह्यात कोरोनाची (Corona Vaccine) दुसरी लस घेण्यावरुन भीती व्यक्त केली जात आहे. सीहोर या भागात लसीकरणावरासाठी गेलेल्या टीमवर लोकांनी दगडफेक केल्याचंही वृत्त आहे. इंदूरमधी एका वयस्कर व्यक्तीने (Indore Old Man Viral Video) लसीकरणासाठी आलेल्या टीमसमोर लस घेण्यास नकार दिला. हवं तर तुम्ही मला फासावर चढवा किंवा गोळी मारा, मात्र मी लस घेणार नाही. या वयस्कर आजोबांनी अशी भूमिका घेतल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं. दरम्यान काहींनी आजोबांचा व्हिडीओ शूट केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना इंदूर येथील रालामंडळ भागातील आहे. या भागात आरोग्य कर्मचाख्यांची टीम लसीकरणासाठी गेली होती. येथील एका वयस्क व्यक्तीने लस घेण्यास नकार दिला. आजोबा म्हणाले, हवं तर मला गोळी घाला, किंवा फासावर चढवा मात्र मी लस घेणार नाही. इतकच नाही आजोबांनी त्या मागील कारणही सांगितलं. वयस्क व्यक्तीने सांगितलं की, जेव्हा त्यांच्या पत्नीला पहिली लस देण्यात आली होती, त्यानंतर त्या आजारी पडल्या आणि 15 दिवसांपर्यंत अंथरूणावर उठू शकली नव्हती. जर पुन्हा लस दिल्यानंतर काही झालं तर मला जेवण कोण देईल? त्यामुळे आजोबांनी सांगितलं की, काहीही झालं तरी मी लस टोचून घेणार नाही. हे ही वाचा-मुंबईवर Omicron चं सावट? परदेशातून धारावीत आलेला व्यक्ती Corona पॉझिटिव्ह यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आजोबांचा एक व्हिडीओ शूट केला होता. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, सरकार सर्वांचं लसीकरण करीत आहे. मात्र तरीही आजोबांनी त्यांचं ऐकलं नाही आणि शिवीगाळ सुरू केला. यानंतर ते म्हणतात सरकार जरी आलं तरी मी लस टोचून घेणार नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona spread, Corona vaccination, Indore

    पुढील बातम्या