Home /News /maharashtra /

राज्यातील Omicron च्या रुग्णांचा आकडा 8 वर, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर; राजेश टोपे म्हणतात...

राज्यातील Omicron च्या रुग्णांचा आकडा 8 वर, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर; राजेश टोपे म्हणतात...

राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट मोडवर (State Health Department) आलाय. राज्यात ओमाक्रॉनच्या रुग्णांची संख्या आता 8 वर गेली आहे.

    मुंबई, 06 डिसेंबर: कोरोना व्हायरसचा (corona virus) नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटनं (Omicron Varient) सर्वांचीच चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रातही या व्हेरिएंटनं (Omicron cases in Maharashtra) शिरकाव केला आहे. राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्यानं वाढत असल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट मोडवर (State Health Department) आलाय. राज्यात ओमाक्रॉनच्या रुग्णांची संख्या आता 8 वर गेली आहे. त्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (State Health Minister Rajesh Tope) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले राजेश टोपे राज्यात ओमायक्रॉनचा विळखा आता अधिकच घट्ट होत चालला असून एकूण रूग्णसंख्या 8 वर जाऊन पोहोचली आहे. ज्यामध्ये मुंबई आणि पुणे प्रत्येकी 1 तर पिंपरी चिंचवड येथील 6 रुग्णांचा समावेश नव्याने समावेश झाला असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. पिंपरी चिंचवड येथील एक महिला नायजेरियाहून आपल्या 2 मुलींसह भारतात परतली. येतानाच बाधित असलेलं हे कुटुंब भावाकडे आलेली आणि अशाप्रकारे बधितांची संख्या 6 वर पोहोचली, असं आरोग्यमंत्री म्हणालेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून रुग्णांवर उपचार सुरू असून पूर्ण खबरदारी घेतली जात असल्याचं त्यांनी सांगितले. हेही वाचा-  रामनाथ कोविंद यांचा महाराष्ट्र दौरा, तब्बल 35 वर्षांनी भारताचे राष्ट्रपती किल्ले रायगडावर आजचे सर्व रुग्ण 2 डोस घेतलेले असल्याने सुदैवाने त्यांच्या जीवाला काही धोका नसेल. तरी सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. राज्यात रुग्णांचा आकडा 8 वर डोंबिवलीत ओमायक्रॉनचा (Omicron cases in Maharashtra) रूग्ण आढळल्यानंतर पुणे-पिंपरी-चिंचवड मधून महत्त्वाची बातमी समोर आली. नव्याने हाती आलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड येथून ओमायक्रॉनचे नवे 6 रुग्ण समोर आलं आहेत. त्याशिवाय पुण्यातील एका रूग्णाची नोंद करण्यात आली आहे. पुण्यात सापडलेला रुग्ण हा फिनलँडहून आल्याचं सांगितलं जात आहे. (After Dombivali Omaicron cases in Pune and Pimpri Chinchwad increased the concern of the state) हेही वाचा- राहुल द्रविडला हेड कोच होण्यासाठी कसे तयार केले? दादाने सांगितली Inside Story तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमधील तीन रूग्ण हे नायजेरियातून आलीची माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये अधिकतर लसीकरण झालेले आहेत. तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवड येथील नायजेरियातून आलेल्या रुग्णाच्या संपर्कात येथील तिघेजण आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आणखी 8 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Coronavirus, Rajesh tope

    पुढील बातम्या