मराठी बातम्या /बातम्या /देश /चालकांचं होतंय शोषण; भारतातल्या या शहरात ओला, उबरची सेवा बंद

चालकांचं होतंय शोषण; भारतातल्या या शहरात ओला, उबरची सेवा बंद

चालकांनी त्यांच्या कमाईतला मोठा भाग कंपन्यांना दिला, तर त्यांच्यासाठी फारच थोडे पैसे शिल्लक राहतात. हे कॅबचालक 18 ते 20 तास काम करतात असं

चालकांनी त्यांच्या कमाईतला मोठा भाग कंपन्यांना दिला, तर त्यांच्यासाठी फारच थोडे पैसे शिल्लक राहतात. हे कॅबचालक 18 ते 20 तास काम करतात असं

चालकांनी त्यांच्या कमाईतला मोठा भाग कंपन्यांना दिला, तर त्यांच्यासाठी फारच थोडे पैसे शिल्लक राहतात. हे कॅबचालक 18 ते 20 तास काम करतात असं

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  गुवाहाटी, 01 फेब्रुवारी : भारतातल्या अनेक राज्यांमध्ये ओला आणि उबर कॅब सेवा विस्तारली आहे. नागरिकांनाही फोनच्या एका टॅपवर दारापाशी गाडी बोलवण्याची सवय झाली आहे; मात्र आता भारतातल्या एका शहरामध्ये ओला आणि उबरची कॅबसेवा बंद होणार आहे. यामुळे नागरिकांना त्याचा फटका बसू शकतो; मात्र कॅब कंपन्यांनी त्यांच्या इच्छेनं हा निर्णय घेतला नसून त्यामागे काही वेगळं कारण आहे. आजपासून (1 फेब्रुवारी) ही सेवा गुवाहाटीमध्ये बंद होणार आहे.

  भारताच्या ईशान्येकडच्या आसाम राज्यातल्या गुवाहाटी शहरात आजपासून (1 फेब्रुवारी) ओला आणि उबरची कॅबसेवा बंद होणार आहे. आसाम कॅब कामगार संघटना आणि ऑल गुवाहाटी बाइक आणि टॅक्सी युनियननं हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुवाहाटीत कॅब आणि बाइक सेवा बंद होणार आहे.

  हेही वाचा : Income Tax New Slab : तुम्हाला टॅक्समध्ये 7 लाखांपर्यंत सूट कशी मिळणार? हे समजून घ्या नाहीतर होईल नुकसान

  'द मेघालायन'च्या वृत्तानुसार, ओला आणि उबरची सेवा आसाममध्ये 2015 साली सुरू झाली होती, असं ऑल आसाम कॅब कामगार संघटनेनं म्हटलंय. आधी ही सेवाही चांगली होती व कंपन्यांनी चालकांना चांगला मोबदला दिला होता. त्यानंतर हळूहळू त्यांनी मोबदला कमी केला व ते चालकांचं शोषण करू लागले. प्रत्येक प्रवासामागे कॅब चालकाला 40-60 टक्के कमिशन ओला व उबर या कंपन्यांना द्यावं लागत होतं. ते अतिशय चुकीचं होतं. त्याव्यतिरिक्त चालकांकडून डायनॅमिक फेअरही घेतलं जात होतं. चालकांनी त्यांच्या कमाईतला मोठा भाग कंपन्यांना दिला, तर त्यांच्यासाठी फारच थोडे पैसे शिल्लक राहतात. हे कॅबचालक 18 ते 20 तास काम करतात. गाड्यांसाठी किंवा इतर कारणांसाठी घेतलेलं कर्ज त्यांना फेडायचं असतं.

  चालकांचं सतत शोषण होत असल्यामुळे या सेवा बंद करण्याचा निर्णय घेत असल्याचं दोन्ही संघटनांनी म्हटलंय. एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी त्याबाबत खुलासा केलाय. या कंपन्यांकडून दिली जाणारी सेवा योग्य नसून, त्यात चालकांचं शोषण होत असल्याचा त्यांचा आरोप आहे.

  Budget 2023 : अर्थसंकल्पात घोषणांवर घोषणा, पण सरकारकडे एवढा पैसा येतो कुठून? जाणून घ्या, प्रत्येक रुपयाचा हिशोब

  आसाम ट्रिब्युनच्या वृत्तानुसार, ओला आणि उबर कंपन्यांच्या अंतर्गत अंदाजे 18 हजार कॅब सध्या धावत आहेत. आता बाइक टॅक्सी ऑपरेटर युनियनने Rapido ची सेवाही आजपासून बंद करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे 16 हजार बाइकची ही सेवा आता बंद होईल. आता सरकारनं नवीन अ‍ॅप सुरू करून कॅब आणि बाइकचालकांना दिलासा द्यावा अशी मागणी चालकांनी केली आहे. यामुळे नागरिकांना कॅब आणि बाइकची सेवा अखंड मिळू शकेल. सध्या तिथे असलेल्या स्थानिक कंपन्या Pei India आणि AM2 यांच्या कॅब सेवा सुरू आहेत. त्यांच्या सेवा मात्र आहे तशाच सुरू राहणार आहेत.

  First published:

  Tags: Taxi