भुवनेश्वर, 20 मे : कोरोनाने कित्येक कुटुंब उद्धवस्त केली आहेत. कुणी आपला मुलगा-मुलगी, कुणी भाऊ-कुणी बहीण, कुणी आई-वडील गमावले आहे. अगदी सेलिब्रिटी आणि राजकीय मंडळीसुद्धा याला अपवाद ठरलेली नाहीत. नुकतंच कोरोनामुळे निधन झालेल्या खासदाराच्या (MP died of coronavirus) कुटुंबावर तर एकामागोमाग एक असे दुःखाचे डोंगर कोसळले आहेत. खासदारानंतर त्याच्या दोन मुलांचाही कोरोनाने जीव घेतला आहे.
राज्यसभेतील खासदार आणि पद्म विभूषण शिल्पकार रघुनाथ मोहपात्रा (Raghunath Mohapatra) यांचं काही दिवसांपूर्वीच कोरोनामुळे निधन झालं आहे. कोरोनाविरोधातील त्यांची झुंज अपयशी ठरल्यानंतर त्यांची दोन मुलंही कोरोनाचा लढा हरले आहेत. त्यांचा मोठा मुलगा आणि दुसरा मुलगा दोघांचाही मृत्यू झाला आहे.
Odisha | Eldest son of MP &Padma Vibhushan Raghunath Mohapatra, Jashobanta Mohapatra passed away today in Bhubaneswar. His other son Prasanta Mohapatra, former captain of Odisha Ranji Trophy cricket team, died of COVID y'day. Raghunath Mohapatra had succumbed to COVID19 on May 9
— ANI (@ANI) May 20, 2021
कोरोनाग्रस्त रघुनाथ यांच्यावर भुवनेश्वरच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. 9 मे रोजी त्यांची कोरोनाविरोधातील झुंज अपयशी ठरली.
हे वाचा - Corona दिलासा : मुंबई-पुण्यात कोरोनाचा उतरता आलेख कायम, मृत्युसंख्याही घटली
मोहपात्रा यांच्या दोन मुलांनाही कोरोना झाला होता. त्यांचा दुसरा मुलगा प्रशांत मोहपात्राचं (Prasanta Mohapatra) कालच कोरोनामुळे निधन झालं आहे. तो ओडिशा रणजी ट्रॉफी क्रिकेट टीममचा माजी कॅप्टन होता. भुवनेश्वर एम्समध्येच त्याच्यावर उपचार सुरू होते. तर आज त्यांचा सर्वात मोठा मुलगा जशोपंत मोहपात्रा यांचासुद्धा कोरोनामुळे जीव गेला आहे. एम्स भुवनेश्वरमधून त्यांना एसयूएममध्ये हलवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर होती. ते 52 वर्षांचे होते.
हे वाचा - ज्या Remdesivir साठी होती धडपड; त्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती
मोहपात्रा कुटुंबात 12 दिवसांतच तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एका धक्क्यातून हे कुटुंब सावरलं नाही तर एकामागोमाग एक असे तीन धक्के या कुटुंबाला बसले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Mp, Odisha