नवी दिल्ली, 11 जून : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग सातव्या दिवशी मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 9996 नवीन रुग्ण आढळून आले. तर, 357 जणांचा मृत्यू झाला. याआधी 6 जून रोजी सगळ्यात जास्त 298 लोकांचा मृत्यू झाला होता. यासह आता देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 2 लाख 86 हजार 579 झाला आहे. या आठवड्यात दररोज 9000 हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर, मृतांचा आकडाही 8 हजार पार गेला आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाचे आता 1 लाख 37 हजार 448 अॅक्टिव्ह प्रकरणं आहेत. तर, 8 हजार 102 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र आनंदाची बाब म्हणजे आतापर्यंत 1 लाख 41 हजार 28 लोकं निरोगीही झाले आहे. सलग दुसऱ्यांदा अॅक्टिव्ह केसेस पेक्षा निरोगी रुग्णांची संख्या जास्त आहे. भारताचा रिकव्हरी रेट 49.2% झाला आहे. वाचा- कोरोनामुळे तरुणांसमोर मोठं संकट, पिंपरी चिंचवडसह इतर भागातही अनेकांच्या नोकऱ्या
वाचा- खरं आहे की खोटं: 15 जूननंतर देशभरात पुन्हा लागू होणार कडक लॉकडाऊन? राज्यांबाबत बोलायचे झाल्यास महाराष्ट्रात सर्वात जास्त 94 हजार रुग्ण आहेत. दर दमण आणि दीवमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण दिल्लीहून दमणला आल्याचे बोलले जात आहे. सध्या या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. दुसरीकडे ICMRनं दिलेल्या माहितीनुसार 11 जून सकाळी 9 वाजेपर्यंत भारतात 52 लाख 13 हजार 140 लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तर गेल्या 24 तासांत 1 लाख 51 हजार 808 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. राज्यातील रुग्णांची आकडेवारी पाहा.
जगातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत भारत सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. अमेरिका, ब्राझील, रशिया, ब्रिटन, स्पेन यांच्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. मात्र भारताचा मृत्यूदर रशिया वगळता इतर सर्व देशांपेक्षा कमी आहे. रशियाचा मृत्यूदर 1.27% आहे. वाचा- बापरे! कोरोना व्हायरसमुळे जगात होऊ शकतो 10 कोटी लोकांचा मृत्यू संकलन, संपादन-प्रियांका गावडे.

)







