'मॉब लिंचिंग'च्या वादावर ओवेसींनी दिलं मोहन भागवतांना 'हे' उत्तर!

'मॉब लिंचिंग'च्या वादावर ओवेसींनी दिलं मोहन भागवतांना 'हे' उत्तर!

'देशात सगळीकडे व्देष पसरवला जातोय, याला सर्वस्वी भाजप सरकार जबाबदार आहे.'

  • Share this:

सुरेश जाधव, बीड  08 ऑक्टोंबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मॉब लिंचिंगच्या वादावर आज सकाळी पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली होती. त्यावर MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केलीय. मॉब लिंचिंग आहे, आपल्याच देशात अस्तित्वात आहे. आत्तापर्यंत झालेल्या हिंसक घटना तुम्ही विसरलात का असा सवालही त्यांनी भागवतांना केला. या देशात मॉब लिंचिंग नावाचा प्रकार नाहीये तो पाश्चिमात्य देशातला आहे असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी  केलं होत. ओवेसी म्हणाले, या देशात धर्मनिरपेक्षता राहिलेली नाही. सर्वत्र हिंसक वातावरण आहे. व्देष पसरविला जातोय. पहिले तुच्या गोडसेंना आवरा असंही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, दिल्लीत लहान मुलाला ठेचून मारलं जातं, केवळ मुस्लिम असल्यामुळे मारलं गेलेलं तबरेज प्रकरण ताजं आहे. असं असतानाही मोहन भागवत म्हणतात देशात मॉब लिंचिंग नाही,  हे चुकीचं आहे याच देशात गुजरात, प्रकरण, दिल्ली मधील शीखांच हत्याकांड हे कुठे घडलं याचं उत्तर भागवतांनी दिलं पाहिजे.

तुझ्या बापाला तुरुंगातच घालणार, प्रणिती शिंदेंना माजी आमदाराची धमकी

तुम्ही धर्मनिरपेक्षता वाचविण्याच्या भानगडीत पडू नका आधी समाजला फुटण्यापासून वाचवा असंही ते म्हणाले. देशात सगळीकडे नफरत पसरवली आहे याला सर्वस्वी भाजप सरकार जबाबदार आहे अशी टीकाही त्यांनी केली.

काय म्हणाले सरसंघचालक?

मॉब लिंचिंगच्या घटनांवर बोलताना भागवत म्हणाले, अशा घटनांचा आणि संघाचा काहीही संबंध नाही. मॉब लिंचिंगसारख्या घटना रोखण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. कायदा तोडून हिंसाचार करण्याच्या प्रवृत्ती आपल्या समाजातील परस्पर संबंध नष्ट करत असल्याचे त्यांनी सांगितले. ही प्रवृत्ती आपल्या देशाची परंपरा नाही, तसेच घटनेत देखील अशा प्रकाराला स्थान नाही. किती ही मतभेद असो. कायदा आणि राज्यघटनेच्या मर्यादेत राहिले पाहिजे आणि न्याय व्यवस्था राखली पाहिजे.

पाडापाडीचा खेळ; दौंडमध्ये एकाच नावाचे दोन उमेदवार मैदानात, राष्ट्रवादीला धक्का!

कलम 370 बद्दल बोलताना भागवत म्हणाले केंद्र सरकार (Modi Government) कठोर निर्णय घेऊन हे सिद्ध केले आहे की या सरकारला जनभावना कल्पना आहे. जनतेच्या अपेक्षा, त्यांच्या भावनाचा सन्मान करण्याचे साहस केवळ पुन्हा एकदा निवडूण आलेल्या सरकारमध्ये असते. 370 कलम रद्द करून सरकारने हे सिद्ध करून दाखवले. यंदाच्या वर्षी गुरु नानक यांची 550वी जयंती, महात्मा गांधी यांची 150वी जयंती आणि लोकसभा निवडणूक यासारख्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे हे वर्ष पुढील अनेक वर्षापर्यंत लक्षात राहील, असे भागवत म्हणाले.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 8, 2019, 7:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading