मराठी बातम्या /बातम्या /देश /

टेंटमध्ये नाही, बुलेटप्रुफ मंदिरात विराजमान होणार रामलल्ला; कधी होणार स्थापना?

टेंटमध्ये नाही, बुलेटप्रुफ मंदिरात विराजमान होणार रामलल्ला; कधी होणार स्थापना?

20 मार्चपासून राममंदिराच्या शुद्धीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे

20 मार्चपासून राममंदिराच्या शुद्धीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे

20 मार्चपासून राममंदिराच्या शुद्धीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे

    अयोध्या, 17 मार्च : अयोध्येतील (Ayodhya Ram Mandir) राम जन्मभूमी परिसरातील रामाची मूर्ती तात्पुरत्या कालावधीसाठी हलविण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. दोन दिवसांत रामाच्या मूर्तीसाठी तात्पुरते फायबर मंदिर बांधले जाणार आहे. येथे रामाला बसण्यासाठी मोठं व्यासपीठ तयार करण्यात आलं असून 24 x 17 फूट मंदिरात रामाची मूर्ती बसविण्यात येईल. दिल्लीहून अयोध्येत पोचलेली बुलेटप्रूफ फायबरची रचना तेथे उभारली जाणार आहे. ही प्रक्रिया 2 दिवसांत पूर्ण होईल, असं सांगण्यात आलं आहे. 20 मार्चपासून अयोध्या आणि काशी येथील ज्येष्ठ व्यक्ती अस्थायी मंदिराच्या शुद्धीकरणाचे काम सुरू करतील. हे शुद्धीकरणाचे काम 24 मार्चपर्यंत चालणार आहे. यावेळी ही जमीन संपूर्ण वैदिक पद्धतीने शुद्ध केली जाईल आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 25 मार्च रोजी सकाळी 4 वाजता रामाची मूर्ती नवीन तात्पुरत्या मंदिरात बसवण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. हे वाचा - BJP आमदाराच्या मुलानं विवाहितेवर केला बलात्कार, अत्याचाराचा MMS बनवला आणि... हे तात्पुरते मंदिर पूर्णपणे सुविधांनी सुसज्ज असेल. आतापर्यंत रामाची मूर्ती टेंटमध्ये बसविण्यात आली होती. परंतु आता तात्पुरत्या राम मंदिरात सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी दोन एसी बसविण्यात येणार आहे. मंदिराचे मुख्य पुजारी म्हणाले की, भगवान रामाच्या तात्पुरत्या मंदिराचे बांधकाम जोरात सुरू असून 2 दिवसात ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. मंदिराची जमीन शुद्ध करण्याचे काम 20 मार्चपासून सुरू होणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 25 मार्च रोजी सकाळी 4 वाजता नवीन स्थायी इमारतीत रामाची मूर्ती बसविण्यात येणार आहेत. मंदिराचे ट्रस्टी डॉ. अनिल मिश्रा म्हणाले की, मूर्ती ठेवण्यासाठी तात्पुरते प्लॅटफॉर्म तयार केले गेले आहे. यामध्ये फायबर स्ट्रक्चरचा वापर करण्यात आला आहे. हे काम  2 दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे. हे तात्पुरते मंदिर अग्नि आणि पाण्यापासून सुरक्षित असेल. तसेच उष्णतेपासून बचाव करण्यासाठी दोन एसी लावण्यात आले आहे. हे वाचा  - मुंबई, पुणे आणि नागपूरहून सुटणाऱ्या 23 एक्स्प्रेस रद्द, ही आहे संपूर्ण यादी
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Ayodhya ram mandir

    पुढील बातम्या