मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

BJP आमदाराच्या मुलानं विवाहितेवर केला बलात्कार, अत्याचाराचा MMS बनवला आणि...

BJP आमदाराच्या मुलानं विवाहितेवर केला बलात्कार, अत्याचाराचा MMS बनवला आणि...

सगळ्यात गंभीर म्हणजे आरोपीने महिलेवर बलात्कार करताना तिचे अश्लील व्हिडिओ काढले आणि त्याचा MMS बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होता.

सगळ्यात गंभीर म्हणजे आरोपीने महिलेवर बलात्कार करताना तिचे अश्लील व्हिडिओ काढले आणि त्याचा MMS बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होता.

सगळ्यात गंभीर म्हणजे आरोपीने महिलेवर बलात्कार करताना तिचे अश्लील व्हिडिओ काढले आणि त्याचा MMS बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होता.

  • Published by:  Manoj Khandekar

जमशेदपूर, 17 मार्च : गेल्या काही दिवसांमध्ये महिला अत्याचाराच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. असाच एक गंभीर प्रकार जमशेदपूरमध्ये घडला आहे. एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली स्थानिक भाजप नेत्याच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे आरोपीने महिलेवर बलात्कार करताना तिचे अश्लील व्हिडिओ काढले आणि त्याचा MMS बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होता.

अटक केलेल्या आरोपीचं नाव आकाश मुखी आहे. आकाश हा भाजप नेता आरआयटी मंडळाचे मंत्री विनोद मुखी यांचा मुलगा आहे. असा आरोप केला जात आहे की, बलात्कारानंतर आकाश अश्लील व्हिडिओच्या आधारे महिलेला ब्लॅकमेल करत होता. झारखंडच्या जमशेदपूर जिल्ह्यातील आदित्यपूर इथला हा प्रकार आहे.

शनिवारी आकाश एका महिलेच्या घरात जबरदस्तीनं घुसून तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा अश्लील व्हिडिओ बनवला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पीडित महिला साफसफाई करून एका खासगी गृहनिर्माण सोसायटीत राहते आणि तिचा नवरा शहराबाहेर राहतो.

हे वाचा - 6 दिवसांच्या लेकीला 10 रुपयांत विकलं, वाचा आईवर अशी कोणती परिस्थिती ओढवली?

आरआयटी पोलीस स्टेशनचे प्रभारी श्रीनिवास सिंह म्हणाले की, पीडित महिलेनं पोलीस स्टेशनमध्ये घटनेची तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीवरून आरोपी आकाशला रविवारी अटक करण्यात आली. सोमवारी, पोलिसांनी वैद्यकीय उपचार केृल्यानंतर सरायकेला न्यायालयात पीडितेचे 164 जबाब नोंदवलं आहेत. यानुसार पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे वाचा - 'या' हसऱ्या फोटोमागे आहे अतिशय वाईट बातमी, वाचून फुटेल अश्रूंचा बांध

दरम्यान, आज दिल्लीत बलात्काराचा असाच एक प्रकार समोर आला आहे. दिल्ली पोलिसांनी छेडछाड केल्याप्रकरणी माजी भारतीय खेळाडू आणि बॉक्सिंग कोचला अटक केली. संदीप मलिक (वय 28) असं अटक केलेल्या प्रशिक्षकाचं नाव आहे. संदीप हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यात बॉक्सिंग कोचिंग सेंटर चालवितो. नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालमधील बॉक्सिंग चँपियनशिप दरम्यान आणि नंतर रेल्वे प्रवासादरम्यान संदीपवर एका महिला खेळाडूनं छेडछाड केल्याचा आरोप केला होता.

हे वाचा - मोठा निर्णय; पुढचे 7 दिवस सरकारी कार्यालयं बंद राहणार

First published:

Tags: BJP, Rape case