मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मुंबई, पुणे आणि नागपूरहून सुटणाऱ्या 23 एक्स्प्रेस रद्द, ही आहे संपूर्ण यादी

मुंबई, पुणे आणि नागपूरहून सुटणाऱ्या 23 एक्स्प्रेस रद्द, ही आहे संपूर्ण यादी

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मध्य रेल्वेकडून खबरदारी घेण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मध्य रेल्वेकडून खबरदारी घेण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मध्य रेल्वेकडून खबरदारी घेण्यात आली आहे.

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 17 मार्च :  राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. खबरदारी म्हणून राज्य सरकारकडून मुंबईत  लॉकडाउन करण्याची चर्चा सुरू आहे. परंतु, त्याआधी मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई, पुणे आणि नागपूरमधून सुटणाऱ्या लांबपल्याच्या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याची घोषणा केली आहे. या तिन्ही शहरातून एकूण 23 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मध्य रेल्वेकडून खबरदारी घेण्यात आली आहे. 18 मार्चपासून ते 1 एप्रिल पर्यंत या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. ज्या प्रवाशांना मुंबईतून बाहेर जायचं आहे, अशांसाठी 2 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 18 ते 31 तारखेपर्यंत पूर्णपणे या 23 गाड्या बंद राहणार आहे. या गाड्या करण्यात आल्या रद्द 1)    11007 Mumbai-Pune Deccan Express from 19.3.2020 to 31.3.2020 2)    11008 Pune-Mumbai Deccan Express from 18.3.2020 to 30.3.2020 3)    11201 LTT-Ajni Express on 23.3.2020 and 30.3.2020 4)    11202 Ajni-LTT Express on 20.3.2020 and 27.3.2020 5)    11205 LTT-Nizamabad Express on 21.3.2020 and 28.3.2020 6)    11206 Nizamabad-LTT Express on 22.3.2020 and 29.3.2020 7)    22135/22136 Nagpur-Rewa Express on 25.3.2020 8)    11401 Mumbai-Nagpur Nandigram Express from 23.3.2020 to 1.4.2020 9)    11402 Nagpur-Mumbai Nandigram Express from 22.3.2020 to 31.3.2020 10)    11417 Pune-Nagpur Express on 26.3.2020 and 2.4.2020 11)    11418 Nagpur-Pune Express on 20.3.2020 and 27.3.2020 12)    22139 Pune-Ajni Express on 21.3.2020 and 28.3.2020 13)    22140 Ajni-Pune Express on 22.3.2020 and 29.3.2020 14)    12117/12118 LTT-Manmad Express from 18.3.2020 to 31.3.2020 15)    12125 Mumbai-Pune Pragati Express from 18.3.2020 to 31.3.2020 16)    12126 Pune-Mumbai Pragati Express from 19.3.2020 to 1.4.2020 17)    22111 Bhusaval-Nagpur Express from 18.3.2020 to 29.3.2020 18)    22112 Nagpur-Bhusaval Express from 19.3.2020 to 30.3.2020 19)    11307/11308 Kalaburagi-Secunderabad Express from 18.3.2020 to 31.3.2020 20)    12262 Howrah-Mumbai Duranto Express on 24.3.2020 and 31.3.2020 21)    12261 Mumbai-Howrah Duranto Express on 25.3.2020 and 1.4.2020 22)    22221 CSMT-Nizamuddin Rajdhani Express on 20, 23, 27 and 30.3.2020 23)    22222 Nizamuddin-CSMT Rajdhani Express on 21, 24, 26 and 31.3.2020  मुंबईत लोकल, बस बंद नाही दरम्यान, महाराष्ट्रात Coronavirus ने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. राज्यात Covid-19 पॉझिटिव्ह असलेल्या पहिल्या रुग्णाचा 17 मार्चला मृत्यू झाला. तो मुंबईत दाखल होता. त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीत खळबळ उडाली आहे. मुंबईत कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लोकलची गर्दी कमी होणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे लोकल आणि मेट्रो बंदीच्या निर्णयाकडे अनेकांचं लक्ष होतं. लोकल आणि बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही, त्यावर चर्चा सुरू आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. पण पुढचे 7 दिवस केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सरकारी कार्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचं समजतं.नागरिकांनी ई मेल मार्फत आपल्या तक्रारी कराव्यात असं आवाहन सरकार करणार आहे. लोकल बंद करायची की नाही यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील असं आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले होते. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मास्क सॅनिटाझयरची बनावट विक्री केल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा टोपेंनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. यावेळी त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं तर सुरक्षित आणि आरोग्यदायी रहा असा सल्ला दिला आहे.
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या