मराठी बातम्या /बातम्या /देश /लॉकडाऊनमध्ये पती-पत्नीमध्ये रंगला लुडोचा डाव, जिंकणारा थेट रुग्णालयात दाखल

लॉकडाऊनमध्ये पती-पत्नीमध्ये रंगला लुडोचा डाव, जिंकणारा थेट रुग्णालयात दाखल

जिंकणाऱ्याच्या पाठीचा कणा तुटला असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत

जिंकणाऱ्याच्या पाठीचा कणा तुटला असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत

जिंकणाऱ्याच्या पाठीचा कणा तुटला असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत

वडोदरा, 27 एप्रिल : देशभरात कोरोनाचे (Coronavirus) रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व सेवा बंद आहे. या दरम्यान पती-पत्नीमध्ये तू तू में में होत असेल. काही बातम्यांनुसार लॉकडाऊनमध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. एका छोटाशा कारणातून अशीच एक घटना घडली आहे.

लॉकडाऊनमध्ये ऑन-लाइन लुडो (Online Ludo) खेळामुळे कौटुंबिक कलह निर्माण झाला आहे. लॉकडाऊनमध्ये टाईमपास करण्यासाठी नवरा-बायको लुडोचा खेळ खेळत होते. मात्र रंगाचा बेरंग झाला आणि खेळाचे भांडणात रुपांतर झाले. यामुळे पत्नीला थेट रुग्णालयात दाखल करावे लागले. लुडोमध्ये सतत अपयश आल्याने नवऱ्याने पत्नीला जोरदार मारहाण केली. भांडणाच्या वेळी पतीने पत्नीच्या पाठीवर इतक्या जोरात हल्ला केला की यात तिच्या पाठीचा कणा तोडला. याबाबत हेल्पलाइनवर तक्रार आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

अशाप्रकारे झाले भांडण

इंग्रजी वृत्तपत्र ‘टाइम्स ऑफ इंडिया’ च्या मते, हे प्रकरण  गुजरातमधील वडोदराचे आहे. पत्नी शिकवणी घेते. तर तिचा नवरा इलेक्ट्रॉनिक कंपनीत काम करतो. लॉकडाऊन दरम्यान पतीने घराबाहेर जाऊ नये यासाठी दोघांनी घरातच पतीबरोबर ऑनलाइन लुडो खेळायला सुरुवात केली. 'नवरा लुडो खेळण्यास तयार झाला. पण त्याच्या पत्नीने त्याला सलग तीन-चार वेळा पराभूत केले. अपयशामुळे पती संतापला. यानंतर पतीने पत्नीशी भांडण सुरू केले. या दोघांमध्ये कलह इतका वाढला की भांडणे सुरू झाली. नवऱ्याने पत्नीला मारहाण सुरू केली. त्याने तिच्या पाठीवर जोरदार हल्ला केला यात तिच्या पाठीचा कणा तुटला. नंतर चूक लक्षात येताच पती पत्नीसह रूग्णालयात दाखल झाला.

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पत्नीने पतीच्या घरी जाण्यास नकार दिला. आपल्या माहेरी राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नंतर दोघांमधील वाद मिटला. मात्र यापुढे पतीने पत्नीवर हात उचलला तर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल.

संबंधित -आधीच लॉकडाऊन त्यात भाचीने घातला गोंधळ, काकाने गोळ्या घालून केलं ठार

कोरोनाला हरवण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार, 27 जिल्ह्यांसाठी सरकारची युद्धनीती

First published:
top videos

    Tags: Corona virus in india