कटिहार, 9 एप्रिल : रामायण (Ramayana) ग्रंथाशी संबंधित बातम्या तुम्ही वाचल्या असतीलच. शिवाय, या ग्रंथाचं पठण, पारायण तुमच्या आजूबाजूला केलं जात असेल. पण सलग 40 वर्षं अखंड रामायण वाचनाविषयी तुम्हाला माहीत आहे का? होय! या मंदिरात सलग 4 दशकं न थांबता आणि अथकपणे रामायणाचा पाठ (Ramayana Path) सुरू आहे.
कटिहारमधील (katihar, bihar) एका मंदिरात हा पाठ नित्यनियमानं सुरू आहे. इथल्या यज्ञशाळा मंदिरात गेल्या 40 वर्षांपासून न थांबता रामायणाचं पठण (Ramayana chanting) केलं जात आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बिहारमधल्या या मंदिरात रामायण वाचण्यासाठी पुढील 12 महिन्यांसाठी आगाऊ बुकिंगही करण्यात आलं आहे. भक्तांच्या श्रद्धेची ही एक अद्भुत कथा आहे.
कटिहारच्या बडी बाजार यज्ञशाळा मंदिरात गेल्या 40 वर्षांपासून अखंड दीपप्रज्वलन करून न थांबता रामायणाचं पठण केलं जात आहे. एकही क्षण न थांबता रामायण पाठ सुरू झाल्याची कथा फारच रंजक आहे. या मंदिरात पूर्वी एका वटवृक्षाखाली बजरंगबलीचं स्थान होते. मथुरेतील एका बाबानं (स्थानिक लोक मौनी बाबा म्हणून ओळखतात) यांनी इथं रामायणाचा पाठ सुरू केले. आजही बाबांबद्दल चर्चा आहे की, ते झोपले नाहीत की जमिनीवर बसले नाहीत. ते रात्रीही दोरीवरच विश्रांती घेत असत. महिनाभरानंतर बाबा कुठेतरी गेले. पण त्यांनी सुरू केलेला रामायणाचा पाठ 15 डिसेंबर 1982 पासून समितीच्या लोकांनी घेतला. तेव्हापासून आजतागायत रामायण पठण क्षणभरही थांबलेलं नाही. 24 तास रामायण पाठासाठी जुलै 2023 पर्यंत आगाऊ बुकिंग करण्यात आलं आहे.
काशीचे 5 पंडित रामायणाचा पाठ करवून घेतात
मंदिर आयोजन समितीशी संबंधित विनोद अग्रवाल सांगतात की, या व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी काशीतील 5 पंडितांनाही ठेवण्यात आलं आहे. तसं, समितीच्या परवानगीने कोणतीही महिला किंवा पुरुष रामायण पाठात भाग घेऊ शकतात. बुकिंगच्या बाबतीत, देशातील आणि जगातील लोक 1100 रुपये देणगी देऊन त्यांच्या नावावर 24 तासांसाठी रामायण पाठ बुक करू शकतात.
हे वाचा - 'आमच्यामधलं प्रेम आजही जिवंत,' म्हणत तिनं पतीच्या मृत्यूनंतर 11 महिन्यांनी दिला बाळाला जन्म
विनोद अग्रवाल सांगतात की, संबंधित व्यक्तीने केलेल्या रामायणाच्या पाठाच्या बुकिंगची माहिती त्यांना 10 दिवस अगोदर समितीकडून दिली जाते. कटिहार यज्ञशाला मंदिर परिसरात बजरंगबलीसोबतच श्रीराम, माता सीता, लक्ष्मण तसंच इतर अनेक देवतांच्या मूर्ती स्थापित आहेत. या यज्ञशाला मंदिरावर देशातील आणि जगातील लोकांची नितांत श्रद्धा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.