जाहिरात
मराठी बातम्या / देश / TikTok वर Like मिळाले नाहीत, LockDown मध्ये तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

TikTok वर Like मिळाले नाहीत, LockDown मध्ये तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

TikTok वर Like मिळाले नाहीत, LockDown मध्ये तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

तरुणाईमध्ये टिकटॉकचं इतंक वेड आहे की व्हिडिओसाठी आणि Like मिळवण्यासाठी काहीही करू शकतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

नोएडा, 17 एप्रिल : देशात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. 3 मेपर्यंत असलेल्या लॉकडाऊनच्या या काळात लोकांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, यामुळे सर्वच व्यवहार बंद असल्यानं आर्थिक संकटही उभा राहिलं आहे. तर काहींना नैराश्यानेही ग्रासलं आहे. यातच नोएडामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील नोएडात राहणाऱ्या एका तरुणाने गुरुवारी टिकटॉक व्हिडिओला लाइक मिळत नाही या नैराश्यातून टोकाचं पाऊल उचललं. टिकटॉक व्हिडिओ तयार कऱण्याचं वेड तरुणाईत प्रचंड आहे. याच वेडापायी नोएडात चांद मशिदीजवळ राहणाऱ्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी सायंकाळी तरुणाचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तरुणाला खाली उतरवलं पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. प्राथमिक चौकशी केली असता त्याच्या टिकटॉक व्हिडिओला लाइक मिळत नव्हते म्हणून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

जाहिरात

मृत्यू झालेल्या मुलाचे नाव इकबाल असून त्याचं वय 18 वर्षे होतं. त्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार इकबालला टिकटॉक व्हिडिओ तयार करण्याचा नाद होता. नुकतंच त्यानं टिकटॉकवर काही व्हिडिओ पोस्ट केले होते. मात्र त्याला लाइक मिळत नव्हते. हे वाचा : Coronavirus lockdown : तणावामुळे मायग्रेन, घरच्या घरी करा असे उपाय टिकटॉक व्हिडिओला लाइक मिळत नसल्यानं मुलाला नैराश्य आलं होतं. तो नेहमीच त्रस्त दिसायचा आणि त्याच तणावामुळे मुलानं आत्महत्या केल्याचं इकबालच्या वडिलांनी सांगितलं. पोलिसांनी इकबालच्या मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. हे वाचा : अश्रूंमार्फतही Coronavirus पसरतो का? काय सांगतात तज्ज्ञ?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: tiktok
  • First Published :
जाहिरात
जाहिरात