Coronavirus Lockdown : तणावामुळे मायग्रेन, घरच्या घरी करा असे उपाय
ताणतणाव वाढल्यास मायग्रेनची (Migraine headache) समस्या अधिक तीव्र होते.
|
1/ 5
कोरोनाव्हायरसमुळे लोकं घरात बंदिस्त आहेत. कोरोनाबाबत ऐकून, वाचून ताण, चिंता वाढते आहे आणि यामुळे मायग्रेनची समस्या उद्भवते.
2/ 5
तुळशीची पाने - एक ग्लास दुधात 4 ते 5 तुळशीची पाने टाकून उकळून घ्या. हे दूध कोमट करून प्या. तुळशीच्या पाण्यात अँटिडिप्रेसेंट आणि अॅटिएंझायटी गुण असतात.
3/ 5
मध आणि आले - एक चमचा आले ठेचून घ्या आणि त्यात मध मिसळून याचं सेवन करा. तुम्ही आल्याचा एक तुकडाही तोंडात ठेवू शकता.
4/ 5
लवंग पावडर - डोक्यात तीव्र वेदना होत असतील तर लवंग पावडरही फायदेशीर आहे. एक ग्लास दुधात एक चमचा लवंग पावडर आणि एक चमचा मीठ टाकून प्या. यामुळे डोक्याच्या वेदना तात्काळ कमी होतील.
5/ 5
योगा - मायग्रेनची समस्या वारंवार उद्भवणे, त्याची तीव्रता आणि कालावधी कमी करण्यात योग फायदेशीर ठरतो, असं काही अभ्यासात दिसून आलं आहे.