Home /News /videsh /

अश्रूंमार्फतही CoronaVirus पसरतो का? काय सांगतात तज्ज्ञ?

अश्रूंमार्फतही CoronaVirus पसरतो का? काय सांगतात तज्ज्ञ?

Corona रुग्णांचे डोळे लाल होत असल्याचं एका नर्सने सांगितलं होतं.

    नवी दिल्ली, 17 एप्रिल : कोरोनाग्रस्त व्यक्ती शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर त्यातून उडणा-या थेंबांमार्फत कोरोनाव्हायरस पसरतो, मात्र अश्रूंमार्फतही हा व्हायरस पसरतो का? तर अश्रूंमध्ये कोरोनाव्हायरस सापडलेला नाही, त्यामुळे असा धोका क्वचितच असावा असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. सिंगापूरमधील डॉक्टरांनी हा अभ्यास केला आहे, जो American academy of Ophthalmology मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यांनी 17 कोरोना रुग्णाच्या अश्रूचे तसंच नाक आणि घशातील नमुने घेतले. रुग्णांना कोरोनाचं निदान झाल्यापासून ते रुग्ण बर होईपर्यंत म्हणजे जवळपास 2 आठवडे दररोज या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. डॉक्टरांना दिसून आलं की, या रुग्णांच्या नाक आणि घशाच्या नमुन्यात व्हायरस होते मात्र त्यांच्या अश्रूंमध्ये हा व्हायरस सापडला नाही. देशातील 60 टक्के लोकांना संसर्ग झाल्यानंतर कोरोनाचा नाश होईल? दरम्यान याधी यूएसमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणा-या एका नर्सने रुग्णांचे डोळे लाल असल्याचं सांगितलं होतं. मात्र या अभ्यासात डॉक्टरांना असं कोणतंच लक्षण दिसलं नाही. कोणत्याच रुग्णांना conjuctivities, ज्याला सर्वसामान्यपणे डोळे येणं असं म्हटलं जातं, याची समस्या नव्हती. यामध्ये डोळे लाल होतात म्हणजे पिंक आयची समस्या उद्भवते, डोळ्यांचा दाह होतो, डोळ्यांना खाज येते. शिवाय सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने डोळे लाल होणं हे कोरोनाव्हायरसचं लक्षण नसल्याचं सांगितलं आहे. 'आधी लढा कोरोनाशी' असं म्हणत या पोलिसांनी काय निर्णय घेतला पाहून तुम्ही कराल सला मात्र तरी डोळयांमार्फत कोरोनाव्हायरस शरीरात प्रवेश करतो, त्यामुळे आवश्यक ती सर्व खबरदारी घ्या. असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. Corona रुग्णांचे डोळे लाल होत असल्याचं एका नर्सने सांगितलं होतं. संकलन, संपादन - प्रिया लाड
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या