सोन्याची चाळीशी! ऐन सणासुदीच्या काळात गाठला दराचा उच्चांक

सोन्याची चाळीशी! ऐन सणासुदीच्या काळात गाठला दराचा उच्चांक

दिवाळीपर्यंत सोनं 40 हजारापर्यंत पोहचेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोनं महाग झालं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वेगानं वाढ होत आहे. सोमवारी बाजारात सोन्याच्या दरानं उच्चांकी पातळी गाठली. दहा ग्रॅम सोन्याचा दर 39 हजार 100 रुपयांच्यावर पोहचला आहे. पहिल्यांदाच सोन्याचा दर 39 हजारांच्या पुढे गेला आहे. एका दिवसात 350 रुपयांची वाढ झाली आहे. याआधी सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ झाली होती. डॉलरच्या तुलनेत रुपयांची किंमत कमी झाल्यानं सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. शुक्रवारी सोन्याचा दर 38 हजार 995 रुपयांवर पोहचला होता.

सणासुदीला सोन्याचे दर वाढल्यानं आता खरेदीवर याचा परिणाम होऊ शकतो. गणपतीचा सण तोंडावर आला असताना मुंबईत जीएसटीसह सोन्याचे दर 40 हजारांवर पोहचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला आहे.

दिल्लीत सराफ बाजारात शुक्रवारी सोन्याचा दर 25 रुपयांनी वाढून 38 हजार 995 रुपयांवर स्थिरावला होता. गेल्या आठ दिवसात सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्याचं अखिल भारतीय सराफ संघानं म्हटंल आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या बदलांचा परिणाम देशातील स्थानिक बाजारात होण्याची शक्यता आहे. या आठवड्यातच सोनं 40 हजारांच्या पुढे जाऊ शकतं. जर आंतरराष्ट्रीय बाजारात दर आणखी बदलले तर येत्या 2 ते 3 आठवड्यात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे.

का वाढले सोन्याचे भाव ?

1. जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी आल्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वर्ल्ड बँकच्या अहवालात जागतिक स्तरावर आर्थिक वाढ खुंटल्याचं नमूद केलं आहे. त्यामुळे लोक सोन्यामधल्या गुंतवणुकीवर अवलंबून आहेत.

2. रिझर्व्ह बँकेने सोन्याची खरेदी वाढवली आहे. जगभरातल्या देशांच्या केंद्रीय बँका पुढच्या काही महिन्यांत 374 मेट्रिक टन सोन्याची खरेदी करतील, असा अंदाज आहे. RBI ने मार्च 2018 पासून आतापर्यंत 60 टन सोन्याची खरेदी केली आहे. ही मागणी वाढल्यामुळे सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली.

शेअर बाजार आणि FD ऐवजी इथे गुंतवा पैसे, मिळेल बंपर नफा

3. अमेरिकेने गेल्या 11 वर्षांत पहिल्यांदाच व्याजदरात कपात केली आहे. जेव्हाजेव्हा अमेरिका व्याजदरात कपात करते तेव्हा सोन्याचे भाव वाढतात, असा ट्रेंड आहे. आत्ताही तसंच चित्र पाहायला मिळालं.

4. अमेरिका आणि चीनमधल्या व्यापारयुद्धाचा जगालाच फटका बसला आहे. जागतिक स्तरावर व्यापार मंदावला असल्यामुळे आशियाई देशातलं चलन कमकुवत झालं आहे. त्यामुळे सोन्याला मागणी वाढली.

5. अमेरिका आणि इराणमध्येही तणाव निर्माण झालाय. अशा स्थितीत लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यावर भर देत आहेत.

SPECIAL REPORT: भाभीजीला पाकिस्तानला जाण्याची चटक, दिलं हे चॅलेंज!

Published by: Suraj Yadav
First published: August 26, 2019, 12:03 PM IST
Tags: gold

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading