'फक्त मुस्लिमांच्या आग्रहामुळे काॅंग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत'

'फक्त मुस्लिमांच्या आग्रहामुळे काॅंग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत'

तुमच्या महाविकास आघाडीमागे व सत्तास्थापनेमागे हेच उदिष्ट होते का?

  • Share this:

मुंबई, 21 जानेवारी : महाराष्ट्रातील राजकारण सध्या आरोप-प्रत्यारोपांमुळे चांगलेच गाजत आहे. नांदेड येथे नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात केलेल्या आंदोलनात काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हटले होते की, मुस्लिमांच्या आग्रहामुळे आणि भाजपला रोखण्यासाठी आम्ही शिवसेनासोबत सरकार स्थापन केले आहे. अन्य़था भाजप पुन्हा पाच वर्षांसाठी सत्तेत आली असती. मुस्लीम बांधवांनी भाजपला सत्तेतून बाहेर काढण्याचं आवाहन केल्यानंतर आम्ही शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली, असे चव्हाण यावेळी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अशोक चव्हाण व शिवसेनेवर टीका केली आहे.  तुमच्या महाविकास आघाडीमागे व सत्तास्थापनेमागे हेच उदिष्ट होते का? असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

महाविकास आघाडीने सरकार स्थापन केल्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेस व काॅंग्रेस पक्षाविरोधात अनेकांनी सत्तेसाठी भूमिका बदलल्याचा आरोप केला होता. शिवसेनेसारखा विरोधी विचारसरणी असलेल्या पक्षांबरोबर सरकार स्थापन करण्याची गरज काय, यामागे केवळ सत्ता लालसा असल्याचा आरोप भाजपातील अनेक नेत्यांनी केला होता. काही दिवसांपूर्वी काॅंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकार स्थापनेपूर्वी एकत्रितपणे सरकार स्थापनेबाबत काॅंग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्य़ा चर्चेचा खुलासा केला होता.

आता काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नांदेड येथे सीएए विरोधातील आंदोलनात मुस्लिमांच्या आग्रहामुळे आणि भाजपला रोखण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत सरकारमध्ये एकत्र आल्याचं विधान केलं होतं. चव्हाण यांच्या या विधानवरुन भाजपने सेनेवर जोरदार टीका केली आहे. तुमच्या महाविकास आघाडीमागे व सत्तास्थापनेमागे हेच उदिष्ट होते का? असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

First published: January 21, 2020, 11:45 AM IST
Tags: shivsena

ताज्या बातम्या