नवी दिल्ली, 1 एप्रिल : सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाब केंद्रीय संसाधन मंत्री डॉ. रमेश पोखरिया निशंक यांनी बोर्डाला निर्देश दिले होते. याशिवाय नववी आणि अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा विचार सुरू आहे. काही ठिकाणी नववी आणि अकरावी परीक्षा झाल्या आहेत. जेथे परीक्षा झाल्या नाहीत त्यांबाबत लवकरच विचार करण्यात येईल. याशिवाय दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. सीबीएसई बोर्डाने हे पाऊल उचलावे याबाबतचे निर्देश केंद्रीय मानव संसाधन मंत्री (HRD) डॉ. रमेश पोखरिया निशंक यांनी दिले होते. सध्या देशभरात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आलं आहे. येत्या 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहे. लहान मुलांना याचा फटका बसू नये यासाठी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे सध्या बंद करण्यात आली आहे. मात्र याचा विद्यार्थ्यांना फटका बसू नये यासाठी अनेक राज्यांमध्ये शिक्षण विभागाकडून पुढाकार घेण्यात येत आहे. संबंधित - अमित शहा व अजित डोवाल यांनी रात्री 2 वा. केलं मशीद रिकामी करण्याचं मिशन पूर्ण याबाबत पोखरिया यांवी ट्विट करीत माहिती दिली की, देशभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या विळख्यामुळे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावा असे निर्देश सीबीएसई बोर्डाला देण्यात आले आहेत.
याशिवाय नववी आणि अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात यावा असाही निर्देश बोर्डाला देण्यात आला आहे. आतापर्यंत या विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या परीक्षा, चाचण्या, प्रोजेक्ट याच्या आधारीत मूल्यांकनावर त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जावा, असे निर्देश केंद्रीय मानव संसाधन मंत्री निशंक पोखरिया यांनी दिले आहे. पोखरियांचे यांच्या निर्देशाचे पालन करीत सीबीएसई बोर्डाने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. संबंधित - ‘लॉकडाऊन तोडणं मुश्कील ही नहीं अब नामुनकीन हैं’, पोलिसांची नजर चुकवली तरी…

)







