Home /News /national /

अमित शहा आणि अजित डोवाल यांनी रात्री 2 वा. असं केलं मशीद रिकामी करण्याचं मिशन पूर्ण, वाचा INSIDE स्टोरी

अमित शहा आणि अजित डोवाल यांनी रात्री 2 वा. असं केलं मशीद रिकामी करण्याचं मिशन पूर्ण, वाचा INSIDE स्टोरी

अजित डोवाल हे रात्री साधारण 2 वा. निजामुद्दीनजवळील मर्कझजवळ पोहोचले होते

    नवी दिल्ली, 1 एप्रिल : दिल्लीतील निजामुद्दीनजवळी मर्कझमधील गर्दी कमी करणं फार अवघड होतं. सरकारचे निर्देश आणि पोलिसांनी चेतावनी दिल्यानंतरही जमात बाहेर निघण्यास तयार नव्हते. यावेळी रात्री उशिरा डोवाल यांनी त्यांची समजूत काढण्यासाठी जावे लागले. मशिदीतील मौलाना दिल्ली पोलीस आणि सुरक्षा एजन्सीचं म्हणणं ऐकत नव्हते. अशात गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांनी मशिदी रिकामी करण्यासाठी पाठविले. संबंधित -मरकजमध्ये सामील झालेले 50 जण मुंबईत आल्याने धोका वाढला, पोलिसांकडून शोध सुरू रात्री 2 वाजता मशिद रिकामी करायला पोहोचले डोभाल हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, गृहमंत्री अमित शहा यांच्या आग्रहाखातर डोवाल 28-29 मार्चच्या दरम्यान रात्री 2 वाजता मर्कझला पोहोचले. यावेळी डोवाल यांनी मौलानांची समजूत घातली आणि तेथील उपस्थितांना कोविड – 19 तपासणी करावयास सांगितली. शिवाय त्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यास सांगितले. अमित शाह आणि डोवाल यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले होते. कारण त्यापूर्वीच सुरक्षा एजन्सींनी करीमनगर येथे इंडोनेशियातील 9 कोरोना पीडित लोकांची ओळख पटवली होती. डोवाल यांनी मशिदीच्या मौलानांची समजूत घातली सुरक्षा एजन्सीने मर्कजमधील कोरोना संक्रमणाचा संदेश दुसऱ्याच दिवशी सर्व राज्य व पोलिसांना पाठविला होता. NSA डोवाल यांनी समजूत घातल्यानंतर मर्कझ 27, 28 आणि 29 मार्च रोजी 167 तबलिगी वर्कर्संना रुग्णालयात दाखल करण्याबाबत सहमती झाली. डोवाल यांच्या हस्तक्षेपानंतरच जमात नेता मशिदीच्या साफसफाईसाठी तयार झाले. डोवालने मुस्लिमांसोबत आपल्या जुन्या संपर्काचा उपयोग केला आणि हे मिशन पूर्ण केलं. देशाच्या सुरक्षेसाठी रणनीती बनविण्यासाठी मुस्लीम उलेमा यांच्यासह झालेल्या मीटिंगमध्ये ते सहभागी होते. संबंधित -नागपूरला हाय अलर्ट, ‘मरकज’हून परतलेले 54 जण क्वारंटाइन
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Amit Shah, BJP

    पुढील बातम्या