सुमित सोनवणे, दौंड, 1 एप्रिल : कोरोना व्हायरसने भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. मात्र असं असतानाही पोलीस आले की लपून बसायचे आणि पोलीस गेले की मोकाट रस्त्यावर बाहेर फिरायचे असे सर्रास चित्र पाहायला मिळत आहे. नागरिक याला फारसे गांभीर्याने घेत नसल्याने दौंड तालुक्यातील यवत पोलिसांनी जमिनीवरून नव्हे तर थेट आकाशातून ड्रोनद्वारे नजर ठेवत तब्बल 27 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाउन आहे. अत्यावश्यक सेवा वगळल्या तर सर्वच बंद आहे. आवश्यक असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडा असे पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे. मात्र काही जण मोकाट रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर आता दौंडमधील यवत पोलीस ड्रोनची नजर ठेवून आहेत. त्यामुळे विनाकारण घरा बाहेर फिरणाऱ्यांच्या चांगलच आंगलट आलं असून पाटस, बोरिएंदी, केडगाव, वरवंड, नाथाची वाडी, खामगाव अशा ग्रामीण भागातील गावातील तब्बल 27 जणांवर लॉकडाउनचा आदेश तोडल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील इतर भागातही होत आहे ड्रोनचा वापर पुणे जिल्ह्यातील शहरी भागातल्या ड्रोनच्या यशस्वी प्रयोगानंतर आता ग्रामीण भागातही पुणे ग्रामीणच्या पोलिसांनी आजपासून ड्रोन शूटिंग करायला सुरुवात केली आहे. शिरुर तालुक्यातील सणसवाडीत शिक्रापूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वारंवार विनंती करूनही नागरिक ग्रामस्थ विनाकारण रस्त्यावरती फिरायला फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडत आहेत. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली फेरफटका मारला जात असताना वारंवार विनंती करूनही लोक घरांमध्ये बसत नाही यावरती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पीआय सदाशिव शेलार ,सरपंच रमेश सातपुते, ग्राम विकास अधिकारी बाळनाथ पवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आता रस्त्यावरती विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर आणि ग्रामस्थांवर शिक्रापूर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे . सणसवाडी करोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर लोकांना यामध्ये कसल्याही प्रकारचा गांभीर्य दिसत नाही. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली वारंवार चौकात येणे, रस्त्यावरती फिरणी घोळका करून गप्पा मारणे यामुळे प्रशासनानं हीच भूमिका घेतली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







