पाटणा 15 नोव्हेंबर: बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबात (New Bihar CM) सुरू असलेली चर्चा आता संपणार आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) सोमवारी (16 नोव्हेंबर) मुख्यमंत्रीपदाची शपध घेणार आहेत. तर भाजपचे सुशील कुमार मोदी (Sushil Kumar Modi) हेच उपमुख्यमंत्री असतील असंही आता स्पष्ट झालं आहे. नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट असलं तरी गेल्या काही दिवसांमध्ये त्याबद्दल चर्चा रंगली होती. त्या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळणार आहे. शपधविधीची तयारी सुरू झाली असून मंत्रिमंडळ कसं असेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता निर्माण झाली आहे. दुपारी हा शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग हे पाटण्यात दाखल झाल्यानंतर सगळी चक्र वेगात फिरली. रविवारी नितीश कुमार यांची NDAच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर राजनाथ सिंग, नितीश कुमार आणि घटकपक्षांच्या नेत्यांची बैठक झाली त्यात मंत्रिमंडळाबाबत चर्चा करण्यात आली आहे.
भाजपची संख्या जास्त असल्याने भाजपला मंत्रिमंडळात जास्त जागा आणि महत्त्वाची खाती मिळू शकतात. जेडीयूला कमी जागा मिळाल्याने आता भाजप वरचढ राहणार आहे. तर घटक पक्षांचे किती सदस्य मंत्रिमंडळात असावेत याबाबत चर्चा सुरू असून संध्याकाळी सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. त्यांना त्यांच्या संख्याबळाच्या प्रमाणात पदं मिळणार आहेत.
बिहारचे भाजप प्रभारी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही पाटण्यात दाखल झाले आहेत. सत्तावाटपाच्या चर्चेत त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शपधविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत का हे अजुन स्पष्ट झालेलं नाही.
सदाभाऊ भाजपला म्हणतात.. 'का रे दुरावा', लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Election 2020) अभूतपूर्व यश संपादन केल्यानंतर भाजपचा (BJP)आत्मविश्वास आणखी बुलंद झाला आहे. त्यामुळे भाजपनं 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची ( Lok sabha Elections 2024) आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
लोकसभा निवडणूक 2024 ची रणनीती ठरवण्यासाठी भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी मास्टर प्लान तयार केला आहे. नड्डा लवकरच संपूर्ण देशाचा दौरा करणार आहेत. पक्ष आणखी मजबूत करणे, हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. नड्डा हे लवकरच 100 दिवसांचा भारत दौऱ्यावर निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जेपी नड्डा यांनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची काय रणनीती असेल, यावर आतापासून काम सुरू केलं आहे. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपनं गमावलेल्या जागांवर जेपी नड्डा यांचा फोकस राहाणार आहे. 2024 च्या निवडणुकीत या जागा कशा काबिज करता येतील, यावर भाजपची रणनीती असणार आहे.
JD(U) Chief Nitish Kumar named as the next Chief Minister of Bihar, in NDA meeting at Patna
जेपी नड्डा यांचा 100 दिवसांच्या भारत दौरा हा अत्यंत नियोजनबद्ध असणार आहे. पक्ष आणखी मजबूत करण्यासाठी ते त्या त्या स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
जगाला बनावट कोरोना लशीचा धोका; तज्ज्ञांनी दिला सावधानतेचा इशारा
त्याच बरोबर बिहार निवडणुकीत भाजपला प्रथित यश मिळवून देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करणारे नड्डा लवकरच पक्षाच्या लोकप्रतिनिधींची भेट घेणार आहेत. नव्या संभावित युतीबाबतही ते चर्चा करतील. यासोबतच देशातील इतर राज्यातील भाजपच्या सरकारची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करतील. विविध प्रभावी संघटनांच्या प्रमुखांच्या गाठी भेटी घेतील. कॅडरमध्ये पक्षाची विचारधारा अधिक स्पष्ट करतील.
Published by:Ajay Kautikwar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.