नवी दिल्ली, 19 जानेवारी: आपल्या धडाडीच्या निर्णयासाठी (Decisions) आणि अमोघ वक्तृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) सांगितलेला एक किस्सा (Incidence) सध्या इन्ट्राग्रामवर (Instagram) जोरदार व्हायरल (Viral) होत आहे. रस्त्याने जात असताना आपण त्या रस्त्याची टेस्ट कशी केली, हे सांगण्यााचा नितीन गडकरींचा अनोखा अंदाज या व्हिडिओतून समोर आला आहे. कुठलाही किस्सा ओघवत्या शैलीत आणि रंगवून सांगताना नितीन गडकरी प्रेक्षकांना कसे खिळवून ठेवतात, हेदेखील या व्हिडिओतून दिसून आलं आहे. आपण वेगवेगळ्या महामार्गांचं काम नीट झालं आहे की नाही, याची परीक्षा कशी घेतली, याबाबतचा किस्सा नितीन गडकरींनी या व्हिडिओत सांगितला आहे. अशी घेतली मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेची चाचणीमुंबई-पुणे हा भारतातील पहिला एक्सप्रेस हायवे नितीन गडकरी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना तयार झाला. या हायवेची टेस्ट घेण्यासाठी आपण काय युक्ती केली, ते गडकरींनी सांगितलं आहे. आपण आपल्या गाडीत L&T आणि हिंदुस्थान कन्स्ट्रक्शनचे मालक बसले होते. त्यावेळी आपण आपल्या ड्रायव्हरला गाडीचा वेग 140 किलोमीटर प्रतितास करायला सांगितलं आणि आपल्यासोबत असलेल्या दोन्ही कंपनीच्या मालकांना सांगितलं की आता आपण थर्मास काढून त्यातील चहा पिणार आहोत. 140 किलोमीटर वेगाने गाडी सुरू असताना जर चहाचा एक थेंबही सांडला तरी तुमची खैर नाही, असा दमच त्यांना भरला. त्यानंतर प्रत्यक्ष थर्मास काढून त्यातील चहा आपण प्यायलो, मात्र एकही थेंब खाली न सांडल्याने ती टेस्ट यशस्वी झाली.
मुंबई-दिल्ली हायवेचीही चाचणीपुणे-मुंबई एक्सप्रेस वेचा किस्सा झाल्यावर लगेचच ते दिल्ली मुंबई हायवेचा किस्सा सांगतात. त्यावेळी आपण 140 किलोमीटर वेगाने गाडी चालवली होती, यावेळी हा वेग वाढवून तो आपण 180 किलोमीटर प्रतितास केला आणि तशाच प्रकारे चहा पिऊन चाचणी केली, असं गडकरीनी सांगितलं.
हे वाचा -
गडकरींच्या खास शैलीतला हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर जोरदार व्हायरल होत आहे. गडकरींच्या खुमासदार शैलीमुळे या व्हिडिओला काही मिनिटांतच 20 हजारपेक्षाही अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.
Published by:desk news
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.