नवी दिल्ली, 23 जानेवारी : सामूहिक बलात्कार करुन हत्या करणाऱ्या दिल्लीतील निर्भया प्रकरणातील चारही दोषींना 1 फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे. या प्रकरणात दोषींकडून फाशीची शिक्षा लांबवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे तिहार तुरुंगातील अधिकाऱ्यांनी फाशीच्या तयारीला सुरुवात केली आहे. यावेळी तुरुंग प्रशासनाकड़ून गुन्हेगारांनी त्यांची शेवटची इच्छा, प्रॉपर्टी तत्सम गोष्टींबद्दल माहिती विचारली जात आहे.
फाशीच्या भीतीने खाणं-पिणं सोडलं
चारही गुन्हेगारांनी फाशीच्या भीतीनं खाणं-पिणं सोडलं आहे. चौघापैंकी विनयने दोन दिवसांपासून जेवण सोडलं आहे. पवनचेही खाणं-पिणं कमी झाल्याचं तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्यातुलनेत मुकेश व अक्षय या दोघांच्या वागणुकीत फारसा बदल झालेला दिसून येत नाही. मुकेशने फाशी टाळण्यासाठी सर्वच कायदेशीर प्रयत्न केले होते. याची दया याचिकाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद्र यांनी फेटाळून लावली आहे.
चारही आरोपींना त्यांच्या इच्छेविषयी विचारल्या काहीच प्रतिक्रिया देत नसल्याचे तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आले. चारही आरोपींनी गेल्या दोन दिवसांपासून खाणं-पिणंच सोडल आहे.
1 फेब्रुवारी रोजी होणार फाशी
चारही दोषींना फासावर लटकवण्याची तारीख 1 फेब्रुवारी सकाळी 6 वाजता ठरविण्यात आली आहे. यादरम्यान मुकेश व्यतिरिक्त तीघांपैकी कोणी दया याचिकेचा अर्ज केल्यास पुन्हा काही दिवसांसाठी ही फाशी पुढे ढकलण्यात येईल. यानंतर पुन्हा फाशीची नवी तारीख दिली जाईल, असे कायदेशीर तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
गळ्याचं माप घेतल्यानं डोळ्यात अश्रू
निर्भयाच्या चौघा नराधमांना फासावर लटकवण्यात येणार आहे. त्यासाठी चौघांच्या गळ्याचं माप घेण्यात आलं आहे. गळ्याचा माप घेताना चौघे आरोपी ढसाढसा रडले. कारण मृत्यू त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होता. फाशी देताना सर्व नियमांचं पालन केलं जाणार असल्याचं तुरुंगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. फाशी देणाऱ्याचं वजन जेवढं अधिक तेवढं त्याला कमी उंचीवरून फासावर लटकवलं जातं असल्याचं सांगण्यात आलं आहे.
फाशी देताना दोर तुटला तर शिक्षा माफ होते का?
फाशीची संपूर्ण जबाबदारी ही जल्लादाची असते. मात्र तुरुंगाच्या नियमानुसार फाशी देताना फास जर तुटला तर दोषीची शिक्षा माफ होते का? याबाबत तिहार जेलमधील फाशीची अंमलबाजवणी करणाऱ्या पवन जल्लादने खुलासा केला आहे. "जेव्हा एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्याचं ठरत तेव्हा संपूर्ण खबरदारी घेतली जात असते. देशात आजपर्यंत तरी फाशी देताना दोरखंड तुटल्यामुळे कुणाचीही शिक्षा रद्द झाल्याची घटना घडली नाही. फाशीची अंमलबजावणीही ठरल्याप्रमाणे बजावली गेली आहे",असे पवन यांनी सांगितले.
मुलीची सतत छेड़ काढायचा हा तरुण, वृद्ध पित्याने केली भररस्त्यात हत्या
भारताची लोकशाही संकटात, नागरिकांचे स्वातंत्र्य धोक्यात; अहवालातून खुलासा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.