Home /News /national /

भारताची लोकशाही संकटात, नागरिकांचे स्वातंत्र्य धोक्यात; अहवालातून खुलासा

भारताची लोकशाही संकटात, नागरिकांचे स्वातंत्र्य धोक्यात; अहवालातून खुलासा

जागतिक लोकशाही सूचकांमध्ये भारताचा क्रमांक 10 व्या वरुन 51 व्या स्थानावर गेला आहे

    नवी दिल्ली, 23 जानेवारी : भारतात लोकशाही आहे, असं आपण अभिमानानं म्हणतो. संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकाला आपल्या इच्छेप्रमाणे वागण्याचा हक्क दिला आहे. Of the people, for the people and by the people असं संविधानाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. मात्र द इकनॉमिस्ट इंटेलिजन्ट्स युनिट (ईआययू) ने जारी केलेला अहवाल धक्कादायक आहे. जागतिक लोकशाही सूचकांमध्ये भारताचा क्रमांक 10 व्या वरुन 51 व्या स्थानावर गेला आहे. यावरुन भारतातील नागरिकांच्या स्वातंत्र्यामध्ये घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. ईआययूने जारी केलेला हा अहवाल 165 स्वतंत्र देश आणि दोन क्षेत्रातील लोकशाहीच्या सध्याच्या स्थितीचा अभ्यास करुन तयार करण्यात आला आहे. भारतातील नागरिकांच्या स्वातंत्र्याची घसरण होत असल्याने डेमोक्रॅसी इंडेक्समध्ये भारत 51 व्या स्थानी गेला आहे. डेमोक्रॅसी इंडेक्स ठरविण्यामागे बऱ्याच गोष्टींचा विचार केला जातो. यामध्ये त्या देशातील निवडणूक प्रक्रिया, राजकारणातील पद्धती, राजकीय हस्तक्षेप, नागरिकांचे स्वातंत्र्य, सरकारी कामकाजाच्या पद्धती यासर्व मुद्द्यांचा विचार डेमोक्रॅसी इंडेक्स ठरविताना केला जातो. यामध्ये तीन ते चार विभाजन केलं आहे. भारताच्या नावाचा उल्लेख त्रुटीपूर्ण लोकशाही विभागात असून या यादीत चीन 153 स्थावी आहे. तर ब्राझिलने या यादीत 52वं, रशिया 134, पाकिस्तान 108, श्रीलंका 69, बांग्लादेश 80 व्या आणि उत्तर कोरिया 167 व्या स्थानावर आहे. ही परिस्थिती भीतीदायक असून भारत ही रशिया, चीन या देशांच्या दिशेने वाटचाल करतो की काय ही भीती राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. अद्याप भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. यावर कॉग्रेस किंवा विरोधी पक्ष काय म्हणतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अन्य बातम्या मोदी सरकारसाठी ही निवडणूक का आहे सर्वात आव्हानात्मक? ...आणि या घटनेने मुस्लीम आणि काश्मिरी पंडित आले एकत्र
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: India

    पुढील बातम्या