बदलापूर, 22 जानेवारी : आपल्या मुलीची छेड काढून सतत तिला त्रास देणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या मुलीच्या 67 वर्षाच्या वडील या तरुणाची हत्या केली आहे. सचिन शिंदे असे त्या मुलाचे नाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून सचिन हा नामदेव कोइंड़े यांच्या मुलीची छेड काढत होता. अनेकदा त्याला समज देण्य़ात आला होता. हे प्रकरण बदलापूर पोलीस स्थानकातही गेले होते. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने मुलीच्या वृद्ध वडिलांनी भररस्त्यात सचिनची धारधार सुऱ्याने हत्या केली. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह रस्त्यावर बराच काळ पडून होता.
बदलापूरातील गर्दीच्या सुरवण चौकात हा प्रकार घडला. काल बुधवारी दुपारच्या सुमारात हा थरार घडला. दुपारी मुलीचे वडील यांनी सचिनला धारदार सुऱ्याने खुपसून त्याची निघृणपणे हत्या केली. सचिन हा कोइंडेच्या मुलीला वारंवार त्रास देत होता. मुलीला होणारा त्रास संपवण्यासाठी कोइंडे यांनी थेट सचिनचीच हत्या केली. दुपारी सचिनची हत्या केल्यानंतर आरोपी घरी गेले आणि नातवाला शाळेत सोडायला बाहेर पडले. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पंचनामा केला. सचिन शिंदे याच्यावर यापूर्वीच पोलिसांकडून कारवाई का करण्यात आली नाही याचा तपास सुरू झाले. यापूर्वीच छेड़छाड प्रकरणात सचिनवर कारवाई झाली असती तर हा प्रकार घड़ला नसल्याचे तेथील रहिवाशांचे म्हणणे आहे. या हत्येमागे केवळ मुलीच्या छेड़छाडीचेच कारण आहे, की याला आणखी काही कारण असल्याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. सध्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भारताची लोकशाही संकटात, नागरिकांचे स्वातंत्र्य धोक्यात; अहवालातून खुलासा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.