रामदेव बाबांना मोठा झटका; 'आम्ही CORONIL चं ट्रायल केलंच नाही', निम्सचे डॉक्टर पलटले

रामदेव बाबांना मोठा झटका; 'आम्ही CORONIL चं ट्रायल केलंच नाही', निम्सचे डॉक्टर पलटले

निम्सच्या ज्या डॉक्टरांसह कोरोनिल औषधाचं क्लिनिक ट्रायल केल्याचं पतंजलीने सांगितलं त्याच डॉक्टरांनी आता हात वर केलेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 जून : पतंजलीने (patanjali) कोरोनावरील औषध म्हणून कोरोनिल (coronil) लाँच केल्यानंतर हे औषध चांगलंच वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. या औषधामुळे योगगुरू रामदेव बाबा (ramdev baba) यांच्यासमोर अडचणी अधिकच वाढत चालल्या आहेत. आधी केंद्र आणि राज्य सरकारने या औषधावरून प्रश्न उपस्थित केले. आता पतंजलीने ज्या डॉक्टरांच्या सहयोगाने आपण जयपूरच्या निम्स (nims) रुग्णालयात या औषधाचं क्लिनिक ट्रायल केल्याचं सांगितलं तेच डॉक्टर पलटले आहेत.

आपल्या रुग्णालयात कोरोनिल औषधाचं ट्रायल झालंच नाही तर आयुर्वेदिक औषधं फक्त कोरोना रुग्णांना देण्यात आली, असं निम्सचे चेअरमन बीएस तोमर (BS TOMAR) यांनी सांगितलं आहे.

बीएस तोमर म्हणाले, "आपल्या रुग्णालयात कोरोनाच्या कोणत्याही औषधाचं ट्रायल झालं नाही. आम्ही कोरोना रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अवश्वगंधा, तुळस आणि गुळवेल दिलं होतं. बाबा रामदेव यांनी याला कोरोनाचा 100 टक्के उपचार करणारं औषध कसं म्हटलं याबाबत मी आता काही सांगू शकत नाही. याबाबत फक्त रामदेव बाबाच सांगू शकतात"

हे वाचा - कोरोनाशी झुंज सुरू असताना बहिणीने फोन केल्याचा आनंद- धनंजय मुंडे

विशेष म्हणजे निम्सने सीटीआरआईकडून (Clinical Trials Registry India - CTRI) 20 मे रोजी औषधाच्या इम्युनिटी टेस्टिंगसाठी परवानगी घेतली होती. यानंतर निम्समध्ये या औषधांचं ट्रायलही सुरू झालं. 23 मे रोजी सुरू झालेल्या या ट्रायलच्या एक महिन्यानंतर म्हणजे 23 जूनला रामदेव बाबांसह हे औषध लाँच करण्यात आलं आणि आता निम्सच्या चेअरमननी सांगितलं, की दोन दिवसांपूर्वीच ट्रायलचा परिणाम समोर आला आहे. बाबा रामदेव यांनी कोरोनिल औषध कसं तयार केलं. याबाबत आपल्याला माहिती नाही.

हे वाचा - कोरोनामुळे मृत्युमूखी पडलेल्या 75 टक्के रुग्णांची धक्कादायक माहिती समोर

कोरोनिल लाँच होताच आयुष मंत्रालयाने पतंजलीच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले. या औषधाबाबत सविस्तर माहिती देण्यास सांगितलं. तोपर्यंत औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश दिले. यानंतर उत्तराखंडच्या आयुर्वेद विभागानेही पतंजलीला नोटिस बजावली. खोकला-तापच्या औषधासाठी परवाना दिला होता, कोरोना औषधासाठी परवाना कसा मिळाला, याची विचारणा केली. बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्याविरोधात याचिका करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: June 26, 2020, 5:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading