जाहिरात
मराठी बातम्या / देश / कोरोनामुळे मृत्युमूखी पडलेल्या 75 टक्के रुग्णांची धक्कादायक माहिती समोर

कोरोनामुळे मृत्युमूखी पडलेल्या 75 टक्के रुग्णांची धक्कादायक माहिती समोर

कोरोनामुळे मृत्युमूखी पडलेल्या 75 टक्के रुग्णांची धक्कादायक माहिती समोर

मधुमेहाचा रुग्ण कोरोना संक्रमित रूग्णाच्या संपर्कात आला तर त्यांच्यावर साथीच्या रोगाचा परिणाम जीवघेणा होऊ शकतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 26 जून : कोरोना व्हायरसने देशात थैमान घातले आहे.  मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये कोरोना व्हायरसचा धोका 50 टक्के जास्त असतो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून हाती आलेल्या आकडेवारी नुसार, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या 75 टक्के लोकांना इतर आजार असून मधुमेह असलेल्या रुग्णांना सर्वाधिक जास्त प्रमाण आहे. भारतातील 11 पैकी एक व्यक्ती मधुमेहाने ग्रस्त आहे. जगातील 16.6 टक्के मधुमेह रुग्ण भारतात आहेत. इंडियन अकॅडमी ऑफ डायबेटिसच्या मते मधुमेहाच्या रुग्णांना प्रतिकारशक्ती कमी असते. केवळ कोरोनाच नाही तर इतर रोगांचा धोकाही जास्त आहे. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. दिल्ली एम्सचे ज्येष्ठ डॉक्टर राकेश यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार,  मधुमेहाचा रुग्ण कोरोना संक्रमित रूग्णाच्या संपर्कात आला तर त्यांच्यावर साथीच्या रोगाचा परिणाम जीवघेणा होऊ शकतो.  कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा अहवाल तपासाला असता  या संक्रमणामुळे मृत्यू झालेल्यांपैकी 75 टक्के लोकांमध्ये इतर रोग देखील आढळले आहेत. शरद पवारांवर टीका पडळकरांना पडली महाग, धनगर समितीने दिला दणका केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनामुळे होणाऱ्या 75 टक्के मृत्यू  मधुमेह, ह्रदय किंवा बीपीमुळे झाले आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोनाचा आतापर्यंत केवळ एक हंगाम पाहायला मिळाला आहे. त्यामुळे या रोगाबद्दल  लोकांना जास्त माहिती नाही. सोबतच कोरोना व्हायरसवर अजून फार काही जास्त संशोधन झाले नाही. भारतातील निम्म्याहून अधिक मधुमेह रुग्णांना या आजाराची माहिती नाही. जवळपास 7.7 कोटी पैकी 5.7 कोटी यावर लक्ष ठेवत नाही. जवळपास 20 टक्के लोकं उपचार देखील घेत नाहीत.  कोरोनाच्या गंभीर प्रकरणांमध्ये मधुमेह आणि मेटाबोलिक सिंड्रोम अधिक प्रमाणात आढळतो. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांना कोरोना होण्याचा धोका जास्त आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात