Home /News /national /

पतंजलीचं CORONIL वादात; निम्सच्या डॉक्टरांनी केला आणखी एक धक्कादायक खुलासा

पतंजलीचं CORONIL वादात; निम्सच्या डॉक्टरांनी केला आणखी एक धक्कादायक खुलासा

जयपूरच्या निम्स रुग्णालयात कोरोनिल औषधाचं ट्रायल घेण्यात आलं होतं. 

    नवी दिल्ली, 25 जून : पतंजलीने (patanjali) लाँच केलेल्या कोरोनिल (coronil) औषधाबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित झाले. रामदेब बाबांनी हे औषध कोरोनावर 100 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला. आता राजस्थानमधील ज्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेज अँड रिसर्चेस (NIMS) मध्ये या औषधाचं ट्रायल घेण्यात आलं. तिथल्या डॉक्टरांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, या आयुर्वेदिक औषधाच्या ट्रायलवेळी अॅलोपेथिक औषधही देण्यात आलं होतं. शिवाय या ट्रायलचा अंतिम रिपोर्ट येणं बाकी आहे, असंही निम्स रुग्णालच्या डॉक्टरांनी सांगितलं. या औषधाचं ट्रायल सौम्य लक्षणं असलेल्या आणि लक्षण नसलेल्या कोरोना रुग्णांवरच करण्यात आलं. मात्र जशी या रुग्णांमध्ये लक्षणं दिसून आली तेव्हा त्यांना अॅलोपेथिक औषधं देण्यात आली, अशी माहिती निम्स जयपूरचे चीफ इन्व्हेस्टिगेटर डॉ. गनपत यांनी दिली.  या ट्रायलमध्ये गंभीर कोरोना रुग्णांचा समावेश नव्हता. हे वाचा - मुंबईतलं हे हॉस्पिटल बनलं कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं सेंटर ट्रायलबाबत माहिती देताना डॉ. गणपत यांनी सांगितलं, हा एक डबल ब्लाइंड रँडमाइज्ड ट्रायल होतं. 50 रुग्णांना प्लेसेबो आणि 50 रुग्णांना आयुर्वेदिक औषध देण्यात आलं. पहिल्या, तिसऱ्या आणि सातव्या दिवशी आरटी-पीसीआर टेस्ट केली. त्यावेळी 69% रुग्णांचा टेस्ट तिसऱ्या दिवशी नेगेटिव्ह आला. प्लेसेबो ग्रुपमधील फक्त 50% टेस्ट नेगेटिव्ह होते. सातव्या दिवशी करण्यात आलेल्या टेस्टमध्ये आयुर्वेदिक औषधांच्या ग्रुपमधील सर्व रुग्णांच्या टेस्ट नेगेटिव्ह आल्या. तर प्लेसेबो गटातील 65% रुग्ण होते. म्हणजे 35 टक्के रुग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत. 100  रुग्णांवर करण्यात आलेल्या ट्रायलचा हा सुरुवातीचा रिपोर्ट होता. अंतिम रिपोर्ट 15 ते 25 दिवसांत येईल. त्यानंतर तो मूल्यांकनासाठी पाठवला जाईल, असं ते म्हणाले. हे वाचा - मोठी बातमी! चीन करू शकतो भारतावर जैविक हल्ला, गुप्तचर संस्थांनी केलं सावधान राजस्थान युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ साइन्सेजचे मेडिकल हेल्थ ऑफिसर नरोत्तम शर्मा यांनी सांगितलं, निम्स रुग्णालयात लक्षणं नसलेल्याच कोरोना रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे 100% कोरोना रुग्णांवर उपचार झाले हे सांगणं योग्य नाही. तर राजस्थानचे आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनी सांगितलं, क्लिनिकल ट्रायल सरकारची परवानगी न घेताच करण्यात आले. क्लिनिकल ट्रायलबाबत स्पष्ट गाइडलाइन्स आहेत. संकलन, संपादन - प्रिया लाड
    First published:

    Tags: Coronavirus, Patanjali, Ramdev baba

    पुढील बातम्या