मोठी बातमी! चीन करू शकतो भारतावर जैविक हल्ला, गुप्तचर संस्थांनी केलं सावधान

मोठी बातमी! चीन करू शकतो भारतावर जैविक हल्ला, गुप्तचर संस्थांनी केलं सावधान

कोरोना विषाणूच्या बाबतीत चीनची भूमिका आधीच अनुत्तरणीय आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 जून: मुत्सद्देगिरी व रणनीतीसाठी गलवान खोऱ्यात भ्याड धाडस केल्यानंतर चीन जैविक हल्ला करू शकतो, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूच्या बाबतीत चीनची भूमिका आधीच अनुत्तरणीय आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दबावाखाली असलेला चीन इतर भारतविरोधी देशांतून किंवा दहशतवाद्यांमार्फत थेट जैवीक हल्ला करू शकतो.

दरम्यान, जैविक हल्ल्याला सामोरे जाण्यासाठी भारतीय लष्कराकडे पुरेसे संसाधन असल्याचं रासायनिक आणि जैविक जोखमींवर संशोधन करणार्‍या ग्वाल्हेर-आधारित प्रयोगशाळेतील (डीआरडीई) अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा.. जितेंद्र आव्हाडांनी अक्षय कुमारला फटकारलं; म्हणाले, तू न्यूजपेपर वाचत नाहीस का?

भारत सध्या शेजारच्या देशाच्या अर्थात चीन आणि पाकिस्तान भूमिकेमुळे त्रस्त आहे. तर मुत्सद्दी व सैनिकी घेरावामुळे चीन चक्रावला आहे. सीमेवरही पाकिस्तान गोळीबार करीत आहे. नेपाळची वृत्तीही चांगली नाही. एका वरिष्ठ लष्करी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करून चीन जैविक हल्ल्यासारखे कृत्य करू शकतो.

अलीकडेच लष्कराने दहशतवाद्यांसाठी शस्त्रे बाळगणारे ड्रोन पाडले. ड्रोनद्वारे जैविक हल्ला देखील शक्य आहे. अशा हल्ल्याची तिव्रता सुरूवातीला जाणवत नाही. हल्लाही काही काळानंतर आढळून येतो आणि नुकसानही मोठ्या प्रमाणात होते.

ग्वाल्हेर येथील डीआरडीईच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, भारतीय लष्कर अशा प्रकारच्या धमक्यांना तोंड देण्यासाठी तयार आहे. डीआरडीओच्या वेगवेगळ्या प्रयोगशाळांनी विभक्त रासायनिक जैविक युद्धविधान सूट, विशेष मास्क आदी सारखी विशेष उपकरणे तयार केली आहेत. कोणते जवान वापर करीत आहेत. त्यांना वेळोवेळी विशेष प्रशिक्षण देखील दिले जाते.

हेही वाचा...काम मिळेना म्हणून जीव झाला नकोसा, दोन मुलींसह विहिरीत मारली उडी पण...

हल्ल्यादरम्यान, प्रथम कोणत्या प्रकारचा विषाणू हल्ला करतात, हे शोधले जाते. यानंतर, त्यास तटस्थ करण्यावर भर दिला जातो. त्यानंतर ते नष्ट केले जाते. या प्रक्रियेसाठी विशेष केमिकल 'एजंट मॉनिटर्स' डीआरडीओनं तयार केले आहेत. एनएसजी, एसपीजी सारख्या विशेष पथके त्यांचा चांगला वापर करीत आहेत.

First published: June 25, 2020, 1:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading