जाहिरात
मराठी बातम्या / देश / News18 Mega UCC Poll: 82 टक्के मुस्लीम महिलांना हवा संपत्तीत समान हक्क, पहिल्यांदाच सर्व्हेतून समोर आली मोठी बाब

News18 Mega UCC Poll: 82 टक्के मुस्लीम महिलांना हवा संपत्तीत समान हक्क, पहिल्यांदाच सर्व्हेतून समोर आली मोठी बाब

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

News18 Network exclusive Mega UCC Poll : यूसीसी असा एक कायदा आहे जो विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, दत्तक घेणं आणि देखभाल यासारख्या बाबींमध्ये सर्व धार्मिक समुदायांना सारखाच लागू होईल.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 10 जुलै : समाजातील पुरुष आणि स्त्रिया अशा दोघांनाही संपत्तीचे समान हक्क आणि वारसा हक्क असले पाहिजेत, अशी किमान 82 टक्के मुस्लिम महिलांची इच्छा आहे. न्यूज18 नेटवर्कनं केलेल्या भारतातील सर्वात मोठ्या युनिफॉर्म सिव्हिल कोडसंबंधी (यूसीसी) सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. न्यूज18 च्या 884 पत्रकारांनी यूसीसीसंबंधी थीमवर, देशातील 25 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 8,035 मुस्लिम महिलांच्या मुलाखती घेतल्या. विशेष बाब म्हणजे त्यांनी या मुलाखती यूसीसीचा उल्लेख न करता घेतल्या. 18 ते 65+ वयोगटातील मुस्लिम महिलांचा या सर्वेक्षणात सहभाग होता. प्रादेशिक विविधता, समुदायातील विविधत, साक्षर-निरक्षर, विवाहित व अविवाहित अशा सर्व स्तरांतील या महिला होत्या. (News 18 Mega UCC Poll: घटस्फोटितांना पुनर्विवाहाचा अधिकार असावा का? 74 टक्के मुस्लीम महिलांना वाटतं की…) यूसीसी असा एक कायदा आहे जो विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, दत्तक घेणं आणि देखभाल यासारख्या बाबींमध्ये सर्व धार्मिक समुदायांना सारखाच लागू होईल. कायदा आयोग पुन्हा यूसीसीबद्दल सल्लामसलत करेल, अशी घोषणा केंद्रानं अलीकडेच केली आहे. केंद्राच्या या घोषणेवर मुस्लिम संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. सरकारनं एखाद्या मतचाचणीतील मतांच्या आधारे ‘बहुसंख्याक नैतिकते’च्या नावाखाली धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्याक समुदायांच्या हक्कांवर गदा आणू नये, असं अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचं (AIMPLB) म्हणणं आहे. समान नागरी कायद्याचा सर्वाधिक परिणाम मुस्लिम समाजातील ज्या घटकावर होणार आहे त्या महिलांचं याबाबत काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी न्यूज18 नेटवर्कने हा सर्व्हे करण्याचं ठरवलं होतं. 18 ते 44 वयोगटातील पदवीधर महिलांमध्ये संपत्तीसंबंधी अधिकारांबद्दल अधिक जागरूकता: पुरुष आणि स्त्रियांना मालमत्तेत समान वारसा हक्क असायला हवेत का? असं विचारलं असता, 82 टक्के (6,615) महिलांनी ‘होय’ आणि 11 टक्के (893) महिलांनी ‘नाही’ असं उत्तर दिलं. तर 7 टक्के (527) महिलांनी ‘माहीत नाही’ किंवा ‘सांगू शकत नाही’ हा पर्याय निवडला. ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल्या प्रतिसाद देणाऱ्या महिलांपैकी, 86 टक्के महिलांनी (2,600) ‘होय’, 10 टक्के महिलांनी (313) ‘नाही’, तर 4 टक्के (120) महिलांनी ‘माहीत नाही किंवा सांगू शकत नाही’ असे पर्याय निवडले आहेत. 18 ते 44 वयोगटातील ग्रॅज्युएट महिलांपैकी, 84 टक्के महिलांनी (5,259) ‘हो’, 11टक्के (661) ‘नाही’, आणि 6 टक्के महिलांनी (375) ‘माहीत नाही किंवा सांगू शकत नाही’, अशी उत्तरं दिली. 44+ वयोगटातील, 78 टक्के महिलांनी (1,356) ‘हो’, 13 टक्के महिलांनी (232) ‘नाही’, आणि 9 टक्के महिलांनी (152) ‘माहीत नाही किंवा सांगू शकत नाही’ हे पर्याय निवडले. (News18 मेगा UCC पोल : भारतात समान नागरी कायदा लागू व्हायला हवा का? मुस्लीम महिलांची रोखठोक भूमिका) सर्वेक्षण केलेल्या महिलांपैकी 19 टक्के महिला 18 ते 24 वयोगटातील, 33 टक्के महिला 25 ते 34 वयोगटातील, 27 टक्के महिला 35 ते 44 वयोगटातील, 14 टक्के महिला 45 ते 54 वयोगटातील, 5 टक्के महिला 55 ते 64 वयोगटातील आणि 2 टक्के महिला 65+ वयोगटातील होत्या. तर 70 टक्के विवाहित, 24 टक्के अविवाहित, 3 टक्के विधवा आणि 3 टक्के घटस्फोटित होत्या. सर्वेक्षणातील एकूण महिलांपैकी 73 टक्के सुन्नी, 13 टक्के शिया आणि 14 टक्के पंथाच्या होत्या. सर्वेक्षण केलेल्या महिलांमध्ये, 11 टक्के पदव्युत्तर पदवी घेतलेल्या, 27 टक्के पदवीधर, 21 टक्के इयत्ता 12 वी पेक्षा जास्त शिक्षण झालेल्या, 14 टक्के 10 वी पेक्षा जास्त शिक्षण झालेल्या, 13 टक्के इयत्ता 5 ते 10 वीपर्यंत शिक्षण घेतलेल्या, 4 टक्के इयत्ता पाचवीपर्यंत शिकलेल्या, 4 टक्के निरक्षर आणि 4 टक्के प्राथमिक साक्षर असलेल्या होत्या.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: muslim , news18 , Survey
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात