जाहिरात
मराठी बातम्या / देश / News 18 Mega UCC Poll: घटस्फोटितांना पुनर्विवाहाचा अधिकार असावा का? 74 टक्के मुस्लीम महिलांना वाटतं की...

News 18 Mega UCC Poll: घटस्फोटितांना पुनर्विवाहाचा अधिकार असावा का? 74 टक्के मुस्लीम महिलांना वाटतं की...

News 18 Mega UCC Poll: घटस्फोटितांना पुनर्विवाहाचा अधिकार असावा का? 74 टक्के मुस्लीम महिलांना वाटतं की...

News18 Network exclusive Mega UCC Poll : या सर्व्हेक्षणात 74टक्के महिलांना घटस्फोटित जोडप्यांना दुसरं लग्न करण्याची परवानगी असावी, असं वाटतं.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 10 जुलै : देशातील 25 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये न्यूज18 नेटवर्कने केलेल्या सर्व्हेक्षणात 8,035 मुस्लिम महिलांचं मत जाणून घेतलं. भारतात यूनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याबाबत चर्चा सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 नेटवर्कने सर्वांत मोठा सर्व्हे केला आहे. यामध्ये घटस्फोटित महिला व पुरुषांना विनाअट पुनर्विवाह करण्याची परवानगी मिळावी की नाही, याबद्दल मतं विचारण्यात आली होती. या सर्व्हेक्षणात 74टक्के महिलांना घटस्फोटित जोडप्यांना दुसरं लग्न करण्याची परवानगी असावी, असं वाटतं. UCC चा उल्लेख न करता, News18 च्या 884 पत्रकारांनी देशातील 25 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 8,035 मुस्लिम महिलांच्या UCC संदर्भातील मुलाखती घेतल्या. यामध्ये समान नागरी कायद्यात समाविष्ट विषयांवर त्यांना प्रश्न विचारण्यात आले. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या मुस्लिम महिला 18-65+ कॅटेगरीतल्या होत्या. तसंच त्या सर्व प्रदेश, समुदाय, शैक्षणिक आणि वैवाहिक स्थिती, निरक्षर ते पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल्या होत्या. (News18 मेगा UCC पोल : भारतात समान नागरी कायदा लागू व्हायला हवा का? मुस्लीम महिलांची रोखठोक भूमिका) UCC हा कायदा सर्व धार्मिक समुदायांना विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक घेणं, देखभाल करणं या सर्व गोष्टींबाबत एकसमान पद्धतीने लागू होईल. UCC बद्दल केंद्र सरकारचा कायदा आयोग ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाशी नव्याने चर्चा करेल अशी घोषणा केल्यानंतर अनेक मुस्लिम संघटनांनी त्याला तीव्र विरोध दर्शवला. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानी म्हटलंय की, यूसीसी लागू करण्यासाठी एखाद्या मतचाचणीतील बहुमत (Majoritarian Morality) हे अल्पसंख्य समाजाचं धार्मिक स्वातंत्र्य व अधिकारांपेक्षा वरचढ आहे, असं म्हणणं योग्य नाही. त्यानंतर या संदर्भात मुस्लिम महिलांचं काय म्हणणं आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न न्यूज18 नेटवर्कने केला कारण सद्यस्थितीतील कायद्याचा सर्वाधिक त्रास मुस्लिम महिलांना भोगावा लागत आहे. पुनर्विवाहाचा अधिकार : मुस्लिम महिलांना काय वाटतं? घटस्फोटित जोडप्यांना कोणत्याही निर्बंधाशिवाय पुनर्विवाह करण्याची परवानगी दिली पाहिजे का? असं विचारलं असता 74टक्के (5,918) महिलांनी ‘होय’, 18टक्के (1,450) ‘नाही’, तर 8टक्के (667) ‘माहीत नाही किंवा सांगू शकत नाही’ असं म्हटलं. ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल्या 79टक्के (2,395) महिलांनी ‘होय’, 16टक्के (473) ‘नाही’, व 5टक्के (165) महिलांनी ‘माहीत नाही किंवा सांगू शकत नाही’ असं म्हटलं. 18-44 वयोगटातील, 75टक्के (4,725) महिला ‘हो’ म्हणाल्या, 17टक्के (1,101) ‘नाही’ आणि 7टक्के (469) ‘माहीत नाही किंवा सांगू शकत नाही’ म्हणाल्या. 44+ वयोगटातील, 69टक्के (1,193) महिला ‘हो’, 20टक्के (349) ‘नाही’ म्हणाल्या आणि 11टक्के (198) ‘माहीत नाही किंवा सांगू शकत नाही’ म्हणाल्या. (News18 Mega UCC Poll : पुरुषांना 4 लग्न करण्याचा अधिकार असावा का? मुस्लीम महिलांना याबद्दल काय वाटतं? ) सर्वेक्षण केलेल्या महिलांपैकी 19टक्के 18-24 वयोगटातील, 33 टक्के 25-34 वयोगटातील, 27 टक्के 35-44 वयोगटातील, 14 टक्के 45-54 वयोगटातील 5 टक्के महिला होत्या. 55-64 वयोगटातील आणि 2 टक्के 65 पेक्षा जास्त वयाच्या होत्या. 70 टक्के विवाहित, 24 टक्के अविवाहित, 3 टक्के विधवा आणि 3 टक्के घटस्फोटित होत्या. प्रतिक्रिया नोंदवणाऱ्या महिलांपैकी 73 टक्के सुन्नी, 13 टक्के शिया आणि 14 टक्के इतर होत्या. सर्वेक्षण केलेल्या महिलांमध्ये 11 टक्के पोस्ट ग्रॅज्युएट्स, 27 टक्के ग्रॅज्युएट्स, 21 टक्के महिला 12+ पर्यंत शिक्षण घेतलेल्या, 14 टक्के 10+ पर्यंत शिक्षण घेतलेल्या, 13 टक्के 5-10 वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या, 4 टक्के 5 वीपर्यंत शिकलेल्या, 4 टक्के निरक्षर होत्या आणि 4 टक्के प्राथमिक साक्षर होत्या.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: muslim , news18 , Survey
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात