रायपूर, 16 एप्रिल : छत्तीसगडच्या नक्षली भागात शुक्रवारी (15 एप्रिल 22) पहाटे, केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून (CRPF) नक्षलविरोधी (Naxal) एक मोठे ऑपरेशन करण्यात आले, असे सूत्रांनी न्यूज 18 ला सांगितले. अत्याधुनिक ड्रोनच्या मदतीने ही कारवाई करण्यात. ड्रोनचा वापर ऑपरेशन सुरू करण्यासाठी आणि समाप्त करण्यासाठी करण्यात आला होता, अशीही माहिती मिळाली आहे. ड्रोनचा वापर नक्षलवाद्यांविरुद्ध शस्त्र म्हणून केला गेला, असंही सूत्रांनी सांगितले. बस्तर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागात ही कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती त्यांनी दिली.
राष्ट्रीय सुरक्षा ग्रीडमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ऑपरेशनवर दिल्लीतील (Delhi) उच्चस्तरीय सुरक्षा अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवलं होतं आणि ते पूर्ण झाल्यानंतर सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी छत्तीसगडलाही गेले होते. शिवाय या ऑपरेशननंतर नक्षलवाद्यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे, अशी पुष्टी सूत्रांनी केली. तसंच मात्र, मोस्ट वाँटेड नक्षलवादी नेता माडवी हिडमा अजूनही जिवंत असल्याची शंका सुरक्षा यंत्रणाना असून ते पुष्टी करत आहेत. शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या कारवाईसाठी ड्रोनचा वापर करण्यात आला, असं सूत्रांनी सांगितलं.
नक्षल किंवा माओवादी चळवळ (Moist Movement) 1967 पासून सुरू झाली. त्यावेळी सशस्त्र शेतकऱ्यांनी नक्षलबारीमध्ये उठाव केला आणि नंतर CPI च्या (माओवादी) कार्यकर्त्यांनी आदिवासी आणि स्थानिकांसाठी कायदेशीर सामाजिक-आर्थिक हक्क मिळवण्यासाठी आंदोलनाचं नेतृत्व केलं. तेव्हापासून या भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. छत्तीसगडच्या बस्तर भागातील आसपास गनिम, ज्यात सुकमा, विजापूर, कोंडागाव, कांकेर, नारायणपूर, विजापूर, दंतेवाडा आणि जगदलपूरसारख्या दुर्गम जिल्ह्यांमध्ये सुरू असेल्या या संघर्षात आतापर्यंत अनेक सैनिक हुतात्मा झाले, तर अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
दरम्यान, या ऑपरेशननंतर न्यूज 18 ने सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंग यांच्याकडून प्रतिक्रिया मागितली. ते स्वत: या ऑपरेशनवर लक्ष ठेवून होते. मात्र, त्यांची प्रतिक्रिया अद्याप मिळू शकलेली नाही. तर, दुसरीकडे अधिकाऱ्यांनीही पुष्टी केली की नक्षलवाद्यांच्या गुप्त अड्ड्यांवर कारवाई केल्यानंतर काही मिनिटांत सुरक्षा दलांनी आक्रमकपणे हल्ला केला आणि त्या भागावर बॉम्बफेक केली.
हे ही वाचा-जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा हैदोस, भर दिवसा सरपंचावर गोळ्या झाडत हत्या
हे ऑपरेशन घाईघाईने नाही, तर जवळपास दोन महिन्यांच्या तयारीनंतर करण्यात आले. यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक एजन्सी एकत्र मिळून काम करत होत्या आणि केंद्रीय गृह मंत्रालयदेखील या ऑपरेशनवर थेट लक्ष ठेवून होतं. तसंच हे ऑपरेशन राबवण्यात गृह मंत्रालयाचे (Home Ministry) सल्लागार के. विजय कुमार यांच्यासह उच्चपदस्थ अधिकारी सामील होते. गेल्या 40-50 दिवसांत तपशील गोळा करण्यात आला आणि ठिकाणांची पुष्टी केल्यानंतर, CRPF च्या नेतृत्वाखाली सुरक्षा दलांनी ऑपरेशन सुरू केलं, असे अधिकाऱ्यांनी सांगितलं.
या ऑपरेशननंतर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले बंडखोर नक्षलवादी प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे, त्यामुळे सध्या विविध नक्षलग्रस्त भागांत तैनात असलेल्या सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chhattisgarh, CRPF, Naxal Attack