श्रीनगर, 15 एप्रिल : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. बारामुल्ला जिल्ह्यात अतिरेक्यांनी एका सरपंचाची गोळी झाडून हत्या केली आहे. जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जिल्ह्यातील गावच्या सरपंचांवर गोळीबार करण्याची ही पहिली घटना नाही. याआधी देखील सरपंचाच्या हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. बारामुल्लात आज घडलेल्या घटनेत सरपंच मनझुर अहमद बांगरु यांचा मृत्यू झाला आहे. अतिरेक्यांनी त्यांना एकटं साधत त्यांच्यावर गोळीबार केला. अतिरेक्यांच्या या गोळीबारात बांगरु गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं गेलं. पण रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून अतिरेक्यांचा शोध सुरु आहे. पण या घटनेमुळे संपूर्ण बारामुल्ला जिल्हा हादरला आहे. संबंधित घटनेनंतर पोलिसांनी परिसराला वेढा घातला आहे. अतिरेक्यांना पकडण्यासाठी शोध मोहिम राबवली जात आहे. काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करत या घटनेची माहिती दिली आहे. “अतिरेक्यांनी बारामुल्ला जिल्ह्यात पट्टनच्या गोशबुग परिसरात सरपंच मंजूर अहमद बांगरु यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात बांगरु गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. संबंधित परिसरात वेढा घालण्यात आला असून अतिरेक्यांचा शोध सुरु आहे”, असं काश्मीर झोप पोलिसांनी ट्विटरवर सांगितलं आहे.
J&K | A Sarpanch, Manzoor Ahmad Bangroo shot at and injured by terrorists in Goshbugh Pattan in Baramulla district. He has been rushed to a hospital, police said
— ANI (@ANI) April 15, 2022
जम्मू-काश्मीरमधील काल एक अनपेक्षित आणि वाईट बातमी समोर आली होती. जवानांच्या गाडीचा अपघात झाल्याने तीन जवानांचा मृत्यू झाला होता. तसेच पाच जवान गंभीर जखमी झाले होते. ही बातमी ताजी असताना आज अतिरेक्यांनी एका सरपंचावर गोळीबार केल्याची वाईट बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांता हैदौस सुरुच असतो. अतिरेक्यांकडून वारंवार काहीना काही कुरापत्या सुरुच असतात. शोपियानमध्ये काल सैनिकांच्या गाडीच्या झालेल्या भीषण अपघातामागे अतिरेकीच जबाबदार आहेत. शोपियानमध्ये अतिरेकी आणि भारतीय जवान यांच्यात चकमक सुरु होती. सैनिकांची गाडी चकमकीच्या ठिकाणीच जात होती. पण वातावरण खराब असल्यामुळे रस्ता ओला झाला होता. त्यामुळे रस्त्यावरुन गाडीचे चाक घसरले आणि मोठी दुर्घटना घडली होती.