नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : प्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्ट्राडॅमस (Nostradamus) यांनी लेस प्रोफेटिस या पुस्तकामध्ये हजारो घटनांबाबत आधीच भविष्यवाणी केलेली आहे. नॉस्ट्राडॅमस यांनी व्यक्त केलेले भविष्य (Nostradamus Predictions) बऱ्याच अंशी खरं ठरलं आहे. जगभरातले अनेक नागरिक नॉस्ट्राडॅमस यांनी वर्तवलेल्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवतात. 2021 या वर्षात महामारी, दुष्काळ पडेल अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता त्यांची भविष्यवाणी खरी ठरल्याचं दिसून येतं. 2022साठी नॉस्ट्राडॅमस यांनी काही धक्कादायक भाकितं (Nostradamus Predictions for 2022) केली आहेत. ती कोणती हे जाणून घेऊ या. 'आज तक'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
नॉस्ट्राडॅमस यांच्या भविष्यवाणीनुसार, 2022मध्ये फ्रान्समध्ये मोठं वादळ धडकेल. यामुळे जगातल्या अनेक भागांमध्ये भीषण आग, दुष्काळ आणि पूरस्थिती पाहायला मिळेल. तसंच जग उपासमारीचा सामना करेल. तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवजातीवर हल्ला करेल आणि पर्सनल कम्प्युटरचा ब्रेन मानवावर नियंत्रण मिळवण्यास सक्षम होईल. 2022 हे वर्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवी इंटरफेससह कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence) संगणकाचं असेल आणि रोबोट मानव जातीला नष्ट करतील, असं भाकीत त्यांनी केलं आहे.
नॉस्ट्राडॅमसच्या भाकितांनुसार 2022 मध्ये एक लघुग्रह ( Asteroid) समुद्रात पडेल आणि त्यामुळे प्रचंड लाटा उसळतील. या लाटा पृथ्वीला चारही बाजूंनी घेरतील. समुद्राच्या पाण्यामुळे पृथ्वीचं मोठं नुकसान होईल, असं भविष्य त्यांनी वर्तवलं आहे. 2022 मध्ये विनाशकारी अणुबॉम्बचा (Nuclear) स्फोट होईल. त्यामुळे हवामानात मोठा बदल होईल. तसंच अणुबॉम्बच्या स्फोटामुळे पृथ्वीची स्थितीही बदलू शकते, अशी भविष्यवाणी नॉस्ट्राडॅमस यांनी वर्तवली आहे. याशिवाय, मेनोर्का बेटाच्या जवळच्या भूमध्य समुद्रात क्षेपणास्त्र चाचणीदरम्यान मोठा स्फोट होईल, अशी भविष्यवाणीदेखील नॉस्ट्राडॅमस यांनी 2022 साठी केलेली आहे.
हे ही वाचा-मंगळ ग्रहावर कसा होतो सूर्यास्त? NASA ने पहिल्यांदा शेअर केला अद्भुत फोटो
2022 मध्ये महागाई अनियंत्रित होईल, असं भविष्य नॉस्ट्राडॅमस यांनी वर्तवलं होतं. तसंच अमेरिकी डॉलरचं अवमूल्यन झपाट्याने होईल, असंही भाकीत केलं होतं. त्यांच्या भाकितानुसार, सोनं, चांदी आणि बिटकॉइन ही मालमत्ता मानली जाईल आणि यामध्ये लोक सर्वांत जास्त गुंतवणूक करतील. सध्याची परिस्थिती पाहता त्यांची भविष्यवाणी खरी ठरेल, असं दिसून येत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात बिटकॉइन ( Bitcoin ) प्रचंड तेजीत आहे.
नॉस्ट्राडॅमस यांनी 2022 साठी वर्तवलेल्या भाकितांनुसार, तीन दिवस संपूर्ण जगात अंधार असेल. 2022 हे सुरवातीला विनाश, तर नंतर शांतता घेऊन येईल. शांततेपूर्वी संपूर्ण जग 72 तास अंधारात बुडालेलं असेल. पानगळ होण्याच्या काळात बर्फवृष्टी होऊ शकते. तसंच एका नैसर्गिक घटनेमुळे (Natural Disaster) अनेक देशांची युद्धं सुरू होताच संपतील. तीन दिवसांच्या अंधकारानंतर लोकांच्या जीवनातल्या आधुनिकतेचा अंत होईल. 2021 संपत आलं असून, कोरोनाचं महासंकट अजूनही गेलेलं नाही. येणाऱ्या 2022 कडून अनेकांना अपेक्षा आहेत. नॉस्ट्राडॅमस यांची आधीची भाकितं बऱ्यापैकी खरी ठरत आली आहेत. त्यामुळे 2022ची साठीची त्यांची भाकितं पाहता हे वर्ष जड जाणार असल्याचं दिसून येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: New year