नव्या Traffic Rules चा दणका : 15000 ची स्कूटर आणि 23000 चा दंड

नव्या Traffic Rules चा दणका : 15000 ची स्कूटर आणि 23000 चा दंड

वाहतुकीचे नवे नियम 1 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. त्यामध्ये नियम न पाळणाऱ्यांच्या दंडाच्या रकमेत भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. बिनाहेल्मेटची गाडी चालवणाऱ्या स्कूटरवाल्याला पोलिसांनी पकडलं आणि 23000 रुपयांची पावती फाडली. त्यावर त्यानं काय उत्तर दिलं पाहा

  • Share this:

नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर : वाहतुकीचे नवे नियम 1 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. त्यामध्ये नियम न पाळणाऱ्यांच्या दंडाच्या रकमेत भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. बिनाहेल्मेटची गाडी चालवणाऱ्या स्कूटरवाल्याला पोलिसांनी पकडलं आणि 23000 रुपयांची पावती फाडली. त्यावर त्यानं काय उत्तर दिलं पाहा.

दिल्लीजवळच्या गुरुग्राममध्ये Gurugram घडलेला हा किस्सा आहे. दिनेश मदान हे आपली जुनी स्कूटी घेऊन एका सर्व्हिस रोडने निघाले होते. हेल्मेट घातलं नाही म्हणून वाहतूक पोलिसांनी त्यांना अडवलं. त्यांच्याकडे लायसन्स आणि गाडीची कागदपत्र विचारण्यात आली.गाडीचं RC book सुद्धा मदान यांच्याकडे नव्हतं. गाडी जुनी असल्याने ते जवळ ठेवलेलं नाही, असं मदान यांनी सांगितलं. घरी आहे त्याचा फोटो काढून पाठवायला सांगतो, असंही मदान यांनी सांगितलं. पण ट्रॅफिक पोलिसांनी तातडीने दंडाची पावती फाडली. हेल्मेट आणि आरटी बुक नाही म्हणून त्यांना 23000 रुपयांचा दंड करण्यात आला.

हे वाचा - शेअर बाजार आपटला, गुंतवणूकदारांचं 2.79 लाख कोटींचं नुकसान

"दंड कमी करण्याची मी ट्रॅफिक पोलिसांना विनंती केली. पुढच्या वेळेपासून सर्व कागदरपत्रं जवळ ठेवीन असंही सांगितलं. कारण माझ्या स्कूटीची किंंमत बाहेर विकायला गेलात तर 15000 रुपयेसुद्धा येणार नाही." असं मदान यांनी उत्तर दिलं.

दंड भरण्यास नकार दिला तर लायसन्स जप्त होऊ शकतं. गाडीसुद्धा ताब्यात घेऊ शकतात. गाडी सोडवून आणण्यासाठी मग कोर्टात जावं लागतं. पण इथे गाडीची किंमतच दंडापेक्षा कमी आहे.

नव्या नियमांनुसार, आपत्कालीन वाहनांना रस्ता दिला नाही किंवा अपात्र असाताना गाडी चालवली तर 10 हजार रुपये दंड होऊ शकतो. सीट बेल्ट लावला नाही तरीही मोठा दंड होईल. भरधाव वेगाने गाडी चालवली तर एक हजार रुपयापासून 2 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

हेही वाचा - पैसे काढण्याचे नवे नियम, जाणून घ्या याबद्दल

हे आहेत नवे नियम

1. विनातिकीट प्रवास केला तर 500 रु. दंड पडेल.

2. अधिकाऱ्यांचा आदेश मानला नाही तर 2 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.

3. लायसन्स नसताना गाडी चालवली तर 5 हजार रुपयांचा दंड

4. अपात्र होऊन वाहन चालवल्यास 10 हजार रु. दंड

5. भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्यांना 1 हजार रुपये दंडाची तरतूद आहे.

6. धोकादायक पद्धतीने वाहन चालवलं तर 5 हजार रुपयांचा दंड

7. दारू पिऊन गाडी चालवली तर 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.

8. स्पीडिंग किंवा रेसिंग केलं तर 5 हजार रुपयांचा दंड आहे.

9. परवाना नसताना वाहन चालवलं तर 10 हजार रुपयांचा दंड

10. लायसन्सचे नियम तोडले तर 25 हजार रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंतची तरतूद आहे.

11. वाहनात जास्त सामान भरलं तर 2 हजार रुपयांहून जास्त दंडाची तरतूद आहे.

12. वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असतील तर एका पॅसेंडरला एक हजार रुपये असा दंड पडेल.

13. सीटबेल्ट लावला नाही तर 1 हजार रुपयांचा दंड आहे.

14. स्कूटर किंवा बाईकवर दोनपेक्षा जास्त व्यक्ती असल्या तर 2 हजार रुपयांचा दंड आणि 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द होऊ शकतं.

15. हेल्मेट घातलं नाही तर 1 हजार रुपयांचा दंड आणि 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द होण्याची शिक्षा

16. अँब्युलन्ससारख्या इमर्जन्सी वाहनांना रस्ता दिला नाही तर 10 हजार रुपयांपर्यंत दंड लागू शकतो.

17. इन्शुरन्स नसलेलं वाहन चालवलं तर 2 हजार रुपयांचा दंड पडेल.

18. अल्पवयीन मुलांनी गाडी चालवताना अपघात झाला तर त्यांच्या पालकांना दोषी ठरवलं जाईल. वाहनाची नोंदणीही रद्द होईल.

19. अधिकाऱ्यांना ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत.

---------------------------------

मायलेकीनी धाडस केलं अन् सोनसाखळी चोरांना शिकवला चांगलाच धडा, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2019 08:44 PM IST

ताज्या बातम्या