जाहिरात
मराठी बातम्या / मनी / शेअर बाजार आपटला, गुंतवणूकदारांचं 2.79 लाख कोटींचं नुकसान

शेअर बाजार आपटला, गुंतवणूकदारांचं 2.79 लाख कोटींचं नुकसान

शेअर बाजार आपटला, गुंतवणूकदारांचं 2.79 लाख कोटींचं नुकसान

Share Market, Sensex - शेअर बाजारात मोठी उलथापालथ झालीय. मोठी घसरण झालीय

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 सप्टेंबर : मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण झालीय. सेन्सेक्स 770 तर निफ्टीत 225 अंकांची घसरण झालीय. GDP चा विकास दर कमी झाला, प्राॅडक्शन 15 महिन्यातल्या खालच्या स्तरावर पोचलंय आणि कोर सेक्टरची होणारी हळू वाढ यामुळे भारतीय शेअर बाजारात प्रचंड प्रमाणात घसरण झालीय. सेन्सेक्स 770 अंकांनी घसरून 36, 563वर बंद झालाय. तर निफ्टी 225 अंकांनी कमी होऊन 10, 798 वर बंद झालाय. NSE वर सर्व सेक्टोरल इंडेक्स लाल निशाण्यावर बंद झाले. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 2.79 लाख कोटी रुपये बुडालेत. गुंतवणूकदारांचे बुडाले 2.79 लाख कोटी रुपये मंगळवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. गुंतवणूकदारांचं 2.79 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. आता विम्याची चिंता मिटली, SBI घेऊन येतेय नवी योजना बाजारात घसरण होण्याची कारणं GDP चा विकास दर कमी झाला, प्राॅडक्शन 15 महिन्यातल्या खालच्या स्तरावर पोचलंय आणि कोर सेक्टरची होणारी हळू वाढ यामुळे भारतीय शेअर बाजारात प्रचंड प्रमाणात घसरण झालीय. LIC नं लाँच केली नवी पाॅलिसी, ‘हे’ आहेत फायदे अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेलं ट्रेड वाॅर जोरदार आहे. दोघांनीही एकमेकांच्या उत्पादनांवरचा टॅरिफ वाढवलाय. याचा परिणाम आशियाई बाजारांच्या घरगुती बाजारांवर पाहायला मिळतो. मॅनिफॅक्चरिंग अॅक्टिविटी ऑगस्टमध्ये विक्री कमी झाल्यानं 15 महिन्यात अगदी खालच्या स्तरावर पोचल्यानं शेअर बाजारात निराशा आहे. आधार अपडेट करायचंय? ‘अशी’ आहे सोपी पद्धत याआधी जून तिमाही GDP ग्रोथ 6 वर्षांत खालच्या स्तरावर पोचली होती. IHS मार्किट इंडिया मॅनिफॅक्चरिंग PMI ऑगस्टमध्ये घसरण होऊन 51.4वर आलेला. तो जुलैमध्ये 52.5 वर होता. मे 2018 नंतर तो सर्वात खालचा स्तर होता. VIDEO : युतीच्या फाॅर्म्युल्यावर सेनेसोबत कोण चर्चा करणार? मुनगंटीवार म्हणाले…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात