मराठी बातम्या /बातम्या /देश /

New Traffic Rule : कार आणि दुचाकीचे नियम बदलले; उल्लंघन केल्यास मोठा दंड

New Traffic Rule : कार आणि दुचाकीचे नियम बदलले; उल्लंघन केल्यास मोठा दंड

या नियमांचं उल्लंघन केल्यास 500 रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत दंड  (Fine) भरावा लागू शकतो.

या नियमांचं उल्लंघन केल्यास 500 रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत दंड (Fine) भरावा लागू शकतो.

या नियमांचं उल्लंघन केल्यास 500 रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत दंड (Fine) भरावा लागू शकतो.

  • Published by:  Meenal Gangurde
नवी दिल्ली, 16 जानेवारी : देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) दिल्ली सरकारनं कार आणि मोटारसायकल चालकांसाठी वाहतुकीचे नवीन नियम (New Traffic Rules) लागू केले आहेत. या नियमांचं उल्लंघन केल्यास 500 रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत दंड  (Fine) भरावा लागू शकतो. दुचाकी, चारचाकी वाहनांची वाढती संख्या, रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण, वाहतूक कोंडी या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारनं हे नवीन वाहतूक नियम लागू केले असून, त्यांची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. कारच्या मागच्या सीटवर बसण्याबाबत नियम : शुक्रवारपासून दिल्लीतील वाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, तुमच्या कारमध्ये मागच्या सीटवर बसणाऱ्या व्यक्तीनेही सीट बेल्ट (Seat Belt) लावणे अनिवार्य आहे. मागे बसलेल्या व्यक्तींनी सीट बेल्ट लावला नसल्याचं आढळल्यास दंड भरावा लागेल. याबाबतीत दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, अनेकदा छोट्या-छोट्या चुकांमुळे अपघात झाल्यास गंभीर दुखापत होऊ शकते. यासाठी आता कारमध्ये मागच्या सीटवर बसणाऱ्या लोकांनाही सीट बेल्ट लावणं बंधनकारक आहे. यामुळे अपघात झाल्यास त्यांना दुखापत होण्याची शक्यता कमी होते. हे ही वाचा-KBC : कधी काळी 1 रुपयासाठी पाणी भरायच्या पाबीबेन, लाखो महिलांना केलं आत्मनिर्भर मोटारसायकलस्वारांसाठी नियम : दिल्ली वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आता मोटारसायकलला (Bike) साईड मिरर (Side Mirror) असणं बंधनकारक आहे. साईड मिरर नसतील तर वाहन चालकाला दंड भरावा लागेल. हे दोन्ही नियम मोटर व्हेईकल अॅक्ट 1988 (Motor Vehicle Act 1988) आणि सेन्ट्रल मोटर व्हेईकल अॅक्ट 1989 (Central Motor Vehicle Act 1989) मध्ये पूर्वीपासूनच आहेत; पण आता ते पुन्हा लागू करण्यात आले आहेत. नियम मोडल्यास द्यावा लागेल दंड : कारच्या मागील सीटवर बसलेल्या व्यक्तींनी सीटबेल्ट लावलेला नसल्यास एक हजार रुपये दंड भरावा लागेल, तर मोटारसायकलला साईड मिरर नसेल तर 500 रुपये दंड द्यावा लागणार आहे. दरम्यान, एक ऑक्टोबरपासून केंद्र सरकारनंही वाहतुकीचे नवीन नियम लागू केले असून, नव्या मोटार वाहन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांकडून दुप्पट ते पाचपट दंडाची रक्कम वसूल करण्याची तरतूद यात आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारनं वाहतूक नियमांचं उल्लघन करणाऱ्यांवर अधिक रकमेचा दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
First published:

Tags: Delhi, Traffic

पुढील बातम्या