मुंबई, 16 जानेवारी : 'कौन बनेगा करोडपती-12'च्या (KBC12) 15 जानेवारीच्या भागात दोन कर्मवीरांची कहाणी दाखवली गेली. रवी कटपाडी यांच्यानंतर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी हॉटसीटवर कर्मवीर पाबीबेन रबारी (Pabiben Rabari) यांचं स्वागत केलं.
अमिताभ बच्चन यांनी सांगितलं, की पाबीबेन कधी काळी पाणी भरण्याचं काम करत होत्या. एवढं कष्टाचं काम करण्यासाठी त्यांना केवळ एक रुपया मिळायचा; पण अपार कष्टांतून त्यांनी यश साध्य केलं आहे. आज त्या अडीच लाख महिलांच्या पोशिंद्या झाल्या आहेत. त्यांनी आपलं स्वतःचं एक खास डिझाइन तयार केलं आणि ते लोकांना इतकं आवडलं, की पाबीबेन रबारी एक ब्रँड (Brand) बनल्या. आता पाबीबेन यांनी आपल्यासोबत अनेक महिलांना जोडून घेतलं आहे आणि त्यांना आत्मनिर्भर (Atmanirbhar) बनवण्याचं कार्य त्या करत आहेत. या सगळ्या महिला एकत्र येऊन डिझायनर कपडे (Designer Clothes) आणि बॅग (Bags) तयार करण्याचं काम करतात. केवळ एकट्याने प्रगती करणं चांगलं आहेच; पण आपल्यासोबत इतरांनाही प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाणं हे अधिक उत्तम आहे. कारण त्यातून समाजाचा विकास होण्यास हातभार लागत असतो. पाबीबेन या असंच समाजाला प्रेरक कार्य करत आहेत. म्हणूनच त्यांना केबीसी 12च्या कर्मवीर या विशेष भागात आमंत्रित करण्यात आलं होतं.
'केबीसी'मध्ये पाबीबेन रबारी यांना विचारण्यात आलेले प्रश्न असे होते -
- यापैकी कोणत्या साडीचं नाव एखाद्या स्थळावरून ठेवण्यात आलेलं नाही.
- या प्रश्नाचं योग्य उत्तर त्यांनी दिलं, ते म्हणजे बांधणीची साडी.
- महाभारतातल्या या दोन पात्रांची नावं सांगा.
- या प्रश्नाचं योग्य उत्तर त्यांनी दिलं - शंतनू आणि गंगा
- 2020मध्ये रोशनी नादर-मल्होत्रा यांपैकी कोणत्या कंपनीच्या अध्यक्षा झाल्या?
- या प्रश्नाचं योग्य उत्तर त्यांनी दिलं - एचसीएल टेक्नॉलॉजी
- कोणत्या शहराला कधी काळी न्यू अॅमस्टरडॅम म्हणून ओळखलं जात होतं?
- या प्रश्नाचं योग्य उत्तर त्यांनी दिलं - न्यूयॉर्क सिटी
- या लोकप्रिय भक्तिगीताचे संगीतकार कोण आहेत?
- या प्रश्नाचं योग्य उत्तर त्यांनी दिलं - पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर
- कोणत्या वैज्ञानिकाच्या शोधामुळे एन 95 मास्कची निर्मिती शक्य होऊ शकली?
- या प्रश्नावर त्यांनी व्हिडीओ कॉल ए फ्रेंड (Video Call A Friend) या लाइफलाइनचा वापर केला. उत्तर न मिळाल्यामुळे त्यांनी फ्लिप द क्वेश्चन (Flip The Question) या लाइफलाइनचा (Lifeline) वापर केला. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगितलं. ते होतं - पीटर त्साई
लाइफलाइननंतर आलेला प्रश्न असा होता -
- प्राचीन हिंदू शास्त्रानुसार, यांपैकी कोण नवजात असताना पक्ष्यांनी तिचं लाडाने संगोपन केलं होतं, म्हणून त्यावरून तिचं नाव पडलं होतं?
- यावर आस्क दी एक्स्पर्ट (Ask the Expert) ही लाइफलाइन पाबीबेन यांनी वापरली. त्यानंतर त्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं. ते होतं - शकुंतला
या प्रश्नानंतर शो संपल्याचा बझर वाजला आणि कर्मवीरांनी 25 लाख रुपये जिंकले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.